-
डॉ.
सुधीर रा. देवरे
दर
रविवारी प्रसिध्द होणारे माझे ब्लॉग कमीतकमी एक पानी वा जास्तीत जास्त दोन पाने
इतक्या मजकूरापर्यंत असतात. पण आजचा ब्लॉग फक्त तीन ओळींचा आहे. या तीन
ओळींव्यतिरिक्त त्यात अजून काही लिहावे वा स्पष्टीकरण करावे असे मला वाटत नाही. तीन
ओळींची ही एक प्रतिज्ञा आहे. म्हणून या ब्लॉगचे नावही तीन ओळींची प्रतिज्ञा असेच
दिले आहे.
या
तीन ओळींच्या प्रतिज्ञेचे पालन प्रत्येक भारतीयाने केले (महाराष्ट्राच्या जागी
त्या त्या राज्याचे नाव घेऊन) तर रोज जे देशभर जातीधर्मावर वाद होतात- राजकारणी जे
उथळ राजकारण करत राहतात, याला भारतीय नागरीक सहज थांबवू शकतील. त्या तीन ओळींची
प्रतिज्ञा अशी:
‘’ मराठी (महाराष्ट्रीयन) ही माझी जात आहे!
भारतीयत्व हा माझा धर्म आहे!!
भारताची राज्यघटना हा माझा धर्मग्रंथ आहे!!! ’’
जय भारत!!! जय जगत!!!
प्रजासत्ताक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा !!!
- डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा