गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

आयता धनवरला नागोबा

 


- डॉ. सुधीर राजाराम देवरे

 

                    त्यानं खरं नाव उलश्या नाईक. पन त्याले आक्ख गाव हावलदार म्हनीसन वळखे. खाकी सदरा आनि खाकी आर्धी चड्डी आशा त्याना आंगवर कपडा ऱ्हाये. त्या कपडासवाचू दुसरा कपडा त्याना आंगवर कैन्हबी आनि कोनीबी पाह्या नशेत.

                    ह्या कपडा त्याले ग्रामपंचायतनी यकदाव शी दियेल व्हतात. त्यानं काम म्हनजे रोज गावमझारली दिवाबत्ती करनं. संध्याकाळ जयी का हाऊ हावलदार खांद्यावर टोकरस्नी शिडी घीसन भायेर पडे. गावमझारल्या गल्ली गल्लीमा आनि चौकचौकसमा जायीसन शिडीवर चढीसन झाडवरला मोठा कंदीलले घासतेल भरे. मंग कंदीलना काच पुशीसन कंदील आगपेटीवरी लायी दिये. हाऊ कंदील रातले येनारा जानारा लोकसले उजेड दखाडे. घासतेल संपी गयं का कंदील मस रातले त्यानत्याना वलायी जाये. आशे ह्या हावलदारनं रोजनं काम. या कामना मोबदलामा त्याले कैन्हतरी बिडीकाडीले लागतंस तवढा का व्हयेतना ग्रामपंचायतकडथून पैसा मिळेत.

                    उलश्या हावलदार भिलाटीमा ऱ्हाये. म्हनजे उलश्या हावलदार हाऊ भिल जमातना व्हता. हायी सांगालेच पायजे आशे नही. तरीबी हायी उलश्या हावलदारनी गोट शे, का येक भिलनी गोट शे, का येक मानोसनी गोट शे, का त्यानी जमीननी गोट शे, याना आचंबा मालेच पडेल शे. तशे पाह्य ते गोट जधळ संपयी तधळच हाऊ प्रस्न पडाले पायजे व्हता. पन गोट नीट ध्यान दीसन आयकाकर्ता नहिथे वाचाकर्ता हाऊ पंधा वाचनारस्नी ध्यानात घिदा ते भयान मस फरक दखायी आशे वाटस. जशे, उलश्या हावलदार हाऊ जर भिल जमातना राहता ना ते त्यानंसंगे आशे व्हत का? आशा प्रस्न कोनलेबी सहज पडयी.

                    उलश्या हावलदार हाऊ यखांदी मुख्य जातपातना मानोस ऱ्हाता ते काय सांगवा हायी गोटले येगळी धार येती. उलश्या शिरीमंत व्हयी जाता आनि हायी गोटमा तो आपला पोटमा बळी येता ना. हाऊ आशाकशा अधोपरी शिरीमंत व्हयी गया म्हनीसन निंदा करानीबी पाळी येती. पन उलश्या हावलदार हाऊ भिल जमातना व्हता म्हनीसन तो अडानी ऱ्हायना. त्यानं येवढं येवढं वावरनं तुकडं व्हतं तरी त्या जमीनना तुकडानी त्याना नशीबनी झोळी भरी दिधी व्हती. पन त्याले खाता वनं नही. म्हनून तो ह्या गोटमा आपला पोटमा बळी येस.

                    आपू आता मुळ गोटकडे वळूत. उलश्या हावलदारनं नदीना काठले येक वावरनं तुकडं व्हतं. जमीन इतली चांगली नव्हती. पांढरीफटक खारी माटीनी व्हती. नदीले पूर वना ते पीक आनि वावरना जरासा भाग धशीसन वाही जाये. ह्या वावरना तुकडामा तो पावसाळामा दादर पैरी दिये. जे यी ते कापी घर घी जाये आनि आपली ग्रामपंचायतनी उलशी नौकरी तो इमाने इतबारे करे. वावर नागराले त्यानाजोडे नव्हता नागर ना बैल ना औत ना फाटा. तो काही त्यानी बायको टिकम फनतोलावरी ते जमीननं तुकडं खंदी काढेत आनि दादर फुकी दियेत.

                    आशाच येक याळे दादर पैराकर्ता तो वावरमा गया आनि खंदता खंदता त्याले जमीनमा येक मडकं सापडनं. मडकं वर काढीसन त्यानी नीट पाह्य ते मझार पिवळ्या धमक सोनाना भिसकीटं दखायनात. तो आनि त्यानी बायको आशा हारखी गयात आनि घाबरीबी गयात. सोनंनानं सापडनं ते त्या जागाले दोन पायना बळी देना पडस. म्हंजे मानोसना बळी  देना पडस. तशे कयं नही त्ये तो सोता मानोस मरी जास. नहीथे येडवाई तरी जास हायी त्यासनी लोकसकडथाईन आयकेल व्हतं. गाडगं दपाडीदुपाडी त्यासनी भिलाटीनी झोपडीमा आनं. दोन्ही नवरा बायकोसनी इचार कया! आनि उलश्या हावलदार सरपंचकडे गया. पन सरपंच गाव जायेल व्हता आनि तो दोन- तीन याळ घर येनार नव्हता.

                    उलश्या हावलदारले काही कळ पटनी नही. त्यानी विनू वान्याले दुकानमा येकटं पाह्य आनि त्याले ऱ्हावायनं नही. त्यानी सगळी हकीगत त्याले सांगी आनि आखेरले बोलना, म्हनी आवढी आवढी जमीन मजारलं हायी पीक शे, मी काय करू, आशे त्याले इचारं. विनू वान्याना तोंडले पानी सुटनं. तो उलश्या हावलदारले मांगला घरमा घी गया. त्याले चहा पाजा आनि त्याले समजाडी सांगं, ‘‘हे पाहाय भौ, हायी धन जरी तुले तुनी जमीनमा सापडेल व्हयी, तरी आशे धन ज्याले सापडंस त्यानाजोडे ते ऱ्हात नही बरं. ते कथंबी सरकी जास. आज रातभर जरी तू तुनी झोपडीमा ते ठियं तरी ते रातोरात आथं तथं सरकी जायी. सकाळीज तुले दखानार नही. आता मी सांगस तशे कर. ते मडकं तशेनतशे मन्हाकडे घी ये. कोनले सांगू नको. मी तुले तुनी हयातभर मन्हा दुकान मझारथीन सगळं दिसू. बाजरी, तेल, दाळ, गूळ, गहू, तुले काय किराना जधळ लागत जायी तधळ घी जात जाय. मी कधळच नही म्हननार नही. तुनी जनमनी ददात मीटी जाई. इचार कर आठला आठे. आनि माले सांग.’’

                    आशे म्हनीसन विनू वान्या गप बसना आनि उलश्या हावलदारना समोर येक बारदानमा त्यानी पायलीभर बाजरी आनि ठी. आनि म्हने, ‘‘घी जाय हायी बाजरी तुले.’’ उलश्या हावलदारनी आजून इतली बाजरी कैन्हच दुकानमातीन घियेल नव्हती. त्यानी इचार कया. रातमा ते धन सरकी जायी. आनि हाऊ भाऊ यानं मोऱ्हे कायमना बाजरी, तेल, दाळ देनार व्हयी ते याले ते मडकं दी टाकवा. आपली आवढी आवढी जमीननी हायी आपुले हयातीभरनं पिकाडी दिंध, आशी त्यानी सोतानीच मनमा समजूत घाली. उलश्या नाईकनी बाजरीनं बारदान उचलं आनि म्हने, ‘‘मी ते घी येस.’’

                    विनू वान्या लगेच म्हने, ‘‘घी ये. पन येक आयकी घे भो आखो. तू ते मनाजोडे ठेवाले दी ऱ्हायना हायी तुनी बायकोलेबी सांगू नको बरं. नहीथे ती आथं तथं सांगत सुटई आनि सकाळ पोलीस मना मांगे लागी जातीन. मंग ते धन जप्त व्हयी जाई आनि तुलेभी वनवन आनि मालेभी. तुले ना माले घाल कुत्राले आशे व्हयी जायी बरं. पन हायी जर गडीगुप चिडीचुप राहिनं ते तुलेबी कायमना मन्हाकडथून किराना मिळत जाई. तुनी सगळी हयाती खुशालीमा निंघी जाई’’. उलश्या नाईकले हायीबी पटनं. तो भिलाटीमा वना. झोपडीमाथीन ते मडकं येक बारदानमा गुंडाळी घिदं आनि जावाले निंघना. बायको म्हने, ‘‘कथा घी चालना?’’

‘‘तुले काय करनं शे. गप्प बैस. कोनपन बोलू नको. आपुले कायमना किराना मिळनार शे.’’ आशे म्हनीसन उलश्या नाईकनी ते गाडगं विनू वान्याकडे आनी टाकं. विनू वान्यानी नीट पाह्य. त्याना इश्वास बशे ना. त्यानी ताबडतोब ते मडकं मधला घरमा कथं तरी लपाडं. आनि उलश्या नाईकले म्हने, ‘‘तुले आता काय काय पायजे ते बोल मी दुकानमातीन काढी देस.’’

                    उलश्या नाईकनी येक येक सामान सांगाले सुरुवात कयी. पन विनू वान्या म्हने, ‘तू येकदम येवढा बजार घी जाशी ते भिलाटीमा कोनले वहीम यी. तू रोज रोज काही काही घी  जात जाय दुकानमाथीन. मंग त्यानी जराश्याच जिनसा घिद्यात. उलश्या नाईकले अजून त्यानी बजाडी सांगं. ‘‘हायी जर कोनाजोडे सांगंबिंगं ते मन्हातून वाईट कोनी नही बरं. ध्यानमा  ठेव’’.  विनू वान्यानी बोलानी रीत आता लगेच बदली गयी, हायी उलश्या हावलदारलेबी समजनं. पन आता इलाज नव्हता.

                    उलश्या नाईकले बाजरी, तेल, दाळ, तपकीर आशे काहीतरी लागे आनि दुकानमातीन तो घी जाये. आशा साताठ महिना गयात. आशाच येक याळे उलश्या नाईक बाजरी घेवाले दुकानमा वना ते विनू वान्या नव्हता. त्याना आंडोर व्हता. उलश्या नाईकनी त्याले इचारं,

‘‘भाऊ कथा गया?’’

‘‘गाव गया.’’

‘‘कैन्ह यी?’’

‘‘दोन तीन याळमा यी.’’     

‘‘माले बाजरी पायजे व्हती.’’

‘‘कितली?’’ 

‘‘चंपभर.’’   

‘‘आन पैसा.’’        

‘‘पैसा नहीथ.’’       

 ‘‘मंग उधार नही मिळनार.’’

 ‘‘तुले काय करनं शे. तू फक्त दे आनि तुन्हा बापले सांगी दे मी बाजरी घी गऊ म्हनीसन.’’ 

 ‘‘वा रे वा सांगी दे म्हने, तू काय बाजीराव वाया चालना का? कोन समजंस तू सवताले?’’

          ‘‘अरे भाऊ तुले ठाऊक नही. तू माले बाजरी दे. तुना बा तुले काही बोलनार नही.’’

‘‘आता जास का आखो गाळ्या खास. उधार मिळनार नही सांगं ना येकदाव.’’

                    उलश्या नाईक विनू वान्याना आंडोरले समजाडी समजाडी कद्री गया आनि भयान रागना भरात तो गया सरपंच ना घर. सरपंच येकटाच बशेल व्हता घरमा,

‘‘काय नाईक काय काढं आथं?’’

‘‘आन्ना माले फसाडं पहा त्या विनूभाऊनी.’’

‘‘काय जयं?’’

          उलश्या नाईकनी सगळी हाकीगत सरपंचजोडे सांगी टाकी.

          सरपंचनी सगळं आयकीसन इचारं,

          ‘‘हायी कैन्हनी गोट शे?’’

‘‘जया व्हतीन साताठ महिना. मन्ही जमीननं ते पीक घीसन मी तुमनाकडेच वनथू पयले. पन तुम्ही गाव जायेल व्हतात तैन.’’

‘‘बर आत्ता आशे कर. तुले मी बाजरी देस. दहा रुपयाबी देस तुले. तू आठे परो रातले ये. तवपावत विनू वान्या तुले भेटना तरी त्यानापं काहीच बोलू नको. आनि त्याना दुकानमा काही घेवालेबी जाऊ नको. तुले काय लागयी ते मन्हापं मांग. ध्यानमा राही ना?’’ सरपंचनी खिसामातीन दहा रूपयानी नोट काढी त्याना हातमा दिधी आनि घरमातीन बाजरीबी दिधी.

‘‘हा आन्ना. मी परो रातले इसू. मी कोनापं बोलनार नही’’

 ‘‘आनि त्याना दुकानमा जानं नही’’

          ‘‘हा आन्ना.’’

          ‘‘तू जाय आत्ते.’’

          उलश्या नाईक घर गया.

 

                    उलश्या नाईक रातले सरपंचकडे गया तधळ सरपंच वसरीमा चकराच मारी ऱ्हायंता. उलश्या नाईकले सरपंचनी पाह्य आनि त्याले बसाले खून कयी. गल्लीवरथीन जानारा येक मानोसले सरपंचनी सांगं, अरे इनू वान्याले मन्हा निरोप सांग, तुले बलायं म्हना’. आनि सरपंच आखो वसरीमा चकरा माराले लागा.     

          ‘‘आनि हे पहाय तुले सांगस तशे कर’’ उलश्या नाईकले सरपंच म्हने, ‘‘इनू वान्या वना का तू कायबी बोलानं नही. फक्तहा म्हननं आनि मीचारसू तितलच उत्तर दे. त्याना

प्रस्नले उत्तर देनं नही, समजनं?’’

‘‘हा आन्ना.’’ 

विनू वान्या वना, सरपंचले नमस्कार कया. आनि उलशा हवालदारले पाहिसन यकदम वचकायनाच.

‘‘बैस’’ सरपंचनी विनू वान्याले सांगं. सरपंच थांबना नही. लगेच बोलना, ‘‘हाऊ उलश्या नाईक आनि हाई कोपराले उभी पाजेल कुऱ्हाड.’’ (त्या कुऱ्हाडकडे उलश्या नाईकनीबी पयलांदाच पाह्य). ‘‘तू आता येक शब्दबी बोलू नको. आनि ते मडकं ताबडतोब घी ये.’’   

‘‘पन आन्ना.’’        

‘‘येक शब्द बोलू नको सांगं ना. ऊठ आनि ते घी ये. ते मडकं आनानी मुदत तुले फक्त १० मिनिट देस. १० मिनीटना आगोदर तू आठे वना नही ते उलश्या नाईक कुऱ्हाड घी तुना घरमा यी. उठ आता.’’

                    विनू वान्याले दरदरीसन घाम फुटना. तो ऊठना आनि धावतच घर गया. थोडा येळमा मडकं घीसन वना. सरपंचनी इचारं, ‘‘आनं का?’’   

‘‘हां’’

‘‘ठेव आठे.’’

विनू वान्यानी मडकं घरातली जमीनवर ठियं. सरपंचनी त्या तुकडा पाह्यात आनि इचारं,

ह्या मजारला कितला काढात तू?’’

‘‘येकबी नही आन्ना.’’       

‘‘खरं बोल.’’

‘‘लक्ष्मीनी शपथ. येकबी नही.’’

सरपंचनी येक तुकडा उचलीसन विनू वान्याना हातमा दिधा आनि त्याले सांगं, ‘‘हायी जर तिसरा कानपन गयं ते हायी कुऱ्हाड आनि हाऊ हावलदार ध्यानात ठेव.’’

‘‘नही आन्ना. मी कसाले सांगू कोनाजवळ?’’

‘‘तू आता जाय आठून.’’

                    विनू वान्या निंघी गया. मंग सरपंच हावलदारकडे डोळा वटारी पाहीसन म्हने,  ‘‘आनि तुले काही लाज वाटाले पायजे. सापडेल धन हायी सरकारना मालकीनं ऱ्हास. मी जर हायी सरकारले कळायं ते तुले खडी फोडाले जानं पडयी. धाडू का तुले खडी फोडाले बोल?’’

‘‘नही आन्ना आशे नका करू. मन्ही जमीन खंदाले गऊ पैराकर्ता आनि हायी दिसनं.’’

‘‘जीवले ते भयान भ्यास. आनि मंग लाज नही वाटनी तुले विनू वान्याजवळ ठेवाले देवाले? तू देशनी संपत्ती पाडी ठी व्हती. तुन्ही जमीन शे म्हणजे काय जयं? जमीन मजारलं धन तुन्ह नही ऱ्हात.’’

‘‘म्हनी चूक जयी आन्ना. येवढा गुन्हा पोटमा घाला.’’

‘‘तू भोळा भाबडा म्हनीसन सोडी देस. दुसराले सोडतूना मी. त्याले खडी फोडालेच धाडतू. आता जे जयं ते जयं. कोनाजोडे बोलू नको. ह्या घे तुले पैसा. तुनी कीव वनी म्हनीसन दी  ऱ्हायनू’’ (सरपंचनी दहा दहान्या तीन चार नोटा हावलदारले दिध्यात.)

          ‘‘आनि आता यानं मोऱ्हे काम धंदा कर. पंचायतमा काम करीसन जरासं घरनं भागस ना. ते काम नीट कर आनि कोनाजोडे बोलनास ते तू खडी फोडाले जावानी तयारी ठेव. मंग माले दोश दिवु नको. ध्यानमा ठेव.’’

        ‘‘नही आन्ना मी नही बोलनार कोनाजोडे. येस मी’’ उलश्या हावलदार निंघी गया.   सरपंचनी दार लायी घिदं आनि सोनाना तुकडा मोजा लागा...

 

                    हावलदार तोंड दाबी बुक्यासना मार सोशीसनव्हतं कशे आनि जयं कशे आशा मनातलामनात घोका लागा. धड बायकोजोडे घडेल गोट सांगता इये ना. आपोआप घर इये ती बाजरी, तेल, दाळ, तंबाखू बंद व्हयी गयं. बायको इचारे ते तो इशय बदली दिये. पन मनातीन जाये ना. सरपंचजोडे सांगी आपू आगीतून फफाटामा पडी गवूत, आशे त्याले वाटे.

                    आशा इचार करी करी खंगायी खंगायी उलश्या येडवायी गया. आशा येडापना कराले लागा का तो हातमा फनतोलं घिये आनि नदीना काठवरली आपली जमीनमा खंदी पाहे. आशे करता करता तो काही याळमा गमी गया. त्यानी आशी वागानी रीत आनि येक याळे तोच कायमना निंघी गया म्हनीसन त्यानी बायकोनीबी हाय खायी घिदी. काहीतरी विपरीत जयं, गुपीत धन सापडनं म्हनीसनच धनीनं आशे जयं, आशा इचार करी हावलदारनी बायकोबी येडवायी गयी. येताजाता हातवारा कराले लागी. रस्ताधरी येताजाता काहीतरी मोठमोठाइन बडबडाले लागी. त्या बडबडाना कोनले आर्थ लागे ना. आनि येक याळे ती बी गमी गयी. उलश्या हावलदारले पोरसोर जयं नही. त्याना वंस वल्हायी गया.

          आयता धनवरला नागोबानी आते गावात टूमदार माडी बांधी घिदी.

           (उत्तम अनुवाद दिवाळी अंक नोव्हेंबर २०२३ मध्ये मराठी अनुवादासह प्रकाशित अहिराणी कथा. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

 

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/