शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

अहिरानी आनि इनोद (‘अहिरानीना आगाजा’ संपादकीय)

 - डॉ. सुधीर रा. देवरे

 

     आगाजामा साहित्य धाडाकर्ता आता भयान फोन येवा लागात. बराच नवा लेखकस्नी भाबडापनखाल इचारं, आगाजामा इनोद चालतीन का, इनोद धाडूत का?’ काहीस्नी त्ये अहिरानीमा वहीभर इनोद लिहेल शेतंस आशेभी सांगं. त्यास्ना हिरमोड कशाकाय करवा, तेबी कळत नही. पन सांगाबिगरभी ऱ्हावात नही. आखेरले प्रश्न आपली भाशाना शे. भाशा जगाडनी व्हयी त्ये आपला भाशाभाऊससांगे जरासं मोकळं ढाकळं बोलनंच पडयी, त्याले इलाज नही.

          इनोद लिव्हनारा लेखकस्ना हुरूप वाढावाकर्ता आगोदर सांगस ते आशे, इनोद लिव्हनं वंगटं नही. त्ये चांगलंच शे. चांगला कसबन, दरजेदार इनोद त्ये भाशामा येवालेच पायजे. पन...

          बोली, ग्रामीन बोली, पोटभाशा, जात जमातन्या भाशा ह्या जशाकाय टिंगल, टवाळी, इनोद, गप्पा- टप्पा, गफोड्या, चेश्टा, मस्करी कर्ताच कोनी तयार करेल शेतीस आशे समीकरन भयान पयलापशी आपलाकडे तयार व्हयेल शे.

बोलभाशा हायी उनाड टपोरा लोकस्नी आनि टवाळकी करानी भाशा आशीबी हाटकून कोशीश कोनी कोनी (प्रमानभाशा वालास्नी) यानं आगोदर करेल शे. भाशाकर्ता हायी सगळं भयान वंगटं शे.

          म्हनीसन हायी सरवं फक्त अहिरानी भाशामाच व्हयेल शे आशेबी नही. सगळ्याच बोली भाशास्न आगोदरनं पहिलायेळनं उपयोजन, याच पध्दतखाल सगळीकडे व्हयेल दखास. अगदी मराठी भाशामा ग्रामीन लिखान करनारा साहित्यिक शंकर पाटील, द. मा. मिरासदार यास्नाकडथून सुध्दा जराशी आशीच चूक व्हयेल शे. ग्रामीन साहित्य म्हंजे चुटका, ग्रामीन लोकस्न अडानीपन, शिवराळपन, बावळटपन, चावटपना आशे समीकरन सुरवातले महाराष्ट्रभर (आशा परकारना साहित्यमुळे) व्हयी गयथं. आशा वातावरनले आखो नवीन फोडनी देवानं काम आपुले करनं शे का ते सांगा?

          सुरवातले जर बोली भाशास्मा आशे लिखान जयं व्हयी, त्ये आता आपू ते इसरीसन बोली भाशामा बोलचालनं सहज लिखान कराले पायजे का नही? आपू ल्हानपनपशी अहिरानी भाशा बोलत वनूत त्ये फक्त इनोद कराकर्ता का? खरी गोट काय शे? आपली भाशा आपला जीवनना- जगाना येक आंगनाच भाग शे. आजभी आशा गंजनच लोक गावस्मा- पाडास्मा दखातंस त्ये त्यास्ले अहिरानीवाचू आखो दुसरी भाशा बोलताच येत नही. 

          आपू ल्हानपनपशी आपलं सुखदुख कायम अहिरानी भाशामा मांडत वनूत. आपला गावशिवमा ज्या आपू रोजना घेवादेवाना यव्हार कयात, त्या सरवा अहिरानी भाशामा कयात. मायसांगे बोलनूत ते अहिरानीमा. घरना मानसससांगे बोलनूत ते अहिरानीमा. भाऊबंद, नातेवाईक, सोबती यास्नासांगे बोलनूत अहिरानीमा. इतलंच कसाले आपला घरमा, वाडामा, शेजारपाजारमा ज्या काही परेमना लोक गमीसन दूर निंघी गयात त्यास्नाकर्ता आपू दुखधरी ढसढसं रडनूत ते सुध्दा अहिरानीमा.

          आशी अहिरानी आपली मायभाशा शे. आपला आंगनाच येक भाग शे. तिन्हामा बोलावाचू जर आपलं घटकाभर पान हालत नशे, त्ये ती भाशा आपू फक्त इनोदनी करीसन कशे चालयी आनि आखो कितला याळ?

          म्हनीसन यानं मोऱ्हे आपली अहिरानी भाशामा रोजनं जगनं दिसाले पायजे- गंभीर लिखान व्हवाले पायजे. आपला गावशिवनी सावली, भाशामा टहाळबन दखावाले पायजे. चांगल्या कसबन बीजन्या कथा लिव्हाले पायजे, कादंबर्‍या येवाले पायजे. आवढंच काय अहिरानीमा चांगली आनि गंभीर आशी साहित्य समीक्षा सुध्दा व्हवाले पायजे. नुसता इनोद इनोद करीसन कशे चालयी?

          आनि हायी सगळं कराकर्ताच, म्हंजेच अहिरानीनी वाढ करीसन तिले मोर्‍हली दिशा दखाडाकर्ताच ढोल (१९९८) पशी ते ह्या आगाजा नियतकालिक पावत भाशानी बोलचाल- हालचाल सुरू करेल शे. (याना मजारला काळातबी येक-दोन नियतकालिकं काही याळ चालू जयथात.)

          आपू सरवा जन सोबत राहीसन यानं मोऱ्हेबी हायी काम आशेच करी ऱ्हायनूत ना, ते अहिरानी भाशा तिनतीनी कशी मरयी? आपलाकर्ता तिले कायमनं जित्तं ऱ्हानंच पडयी! राम राम.

                    (‘अहिरानीना आगाजा - ऑक्टोबर २०२२ अंक तीनला लिहिलेले संपादकीय. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/