शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

‘चाळ’ आणि मुळाक्षरे



         

-         डॉ. सुधीर रा. देवरे

                   मी तेव्हा इयत्ता सातवीत असेन. मराठी विषय शिकविण्यासाठी आम्हाला रौंदळ आडनावाचे शिक्षक होते. आमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात पु. ल. देशपांडे यांच्या बटाट्याची चाळह्या पुस्तकातील एक धडा समाविष्ट झालेला होता. शिक्षक त्या धड्यातील एकेक उतारा वाचून आमच्या चेहर्‍यावरील प्रतिक्रिया न्याहाळत होते. धड्यातील उतार्‍याबटाट्याची चाळअसा उल्लेख येत होता व त्याला अनुसरून लेखकाचे जे भाष्य होत होते, ते ऐकून आम्ही हसून प्रतिसाद द्यावा अशी शिक्षकाची अपेक्षा होती. तसा प्रतिसाद आमच्याकडून मिळत नव्हता म्हणून शिक्षक वैतागले. त्या वैतागातच ते म्हणाले, ‘‘तुम्हाला विनोद कळतो की नाही? तुमच्या चेहर्‍यावरची तर रेषाही हलत नाही. अरे, ही विनोदी भाषा आहे, एवढं तरी कळतं का तुम्हाला?’’ आमच्या शिक्षकांचा वैताग जितका खरा होता तितकीच विशिष्ट शब्दामुळे अशा विनोदाला दाद देता येत नसल्याची आमची अडचणही साहजिक होती. तो शब्द म्हणज बटाट्याच़ी चाळ’.  कारण आम्हाला परिचयाचा शब्द होता, कांदानी चाळ’.  शेतातून कांदे काढल्यानंतर ते बाजारात घेऊन जाण्याआधी व्यवस्थितपणे ठेवण्यासाठी आमच्याकडील अहिराणी भागातील शेतकरी कांद्यांची चाळतयार करतात. ग्रामीण झोपडीसारखी ह्या चाळीची रचना असून ती झोपडीपेक्षा खूप लांबट असते. दोन्ही बाजूंना झोपडीसारखा उतार देऊन वर उसाचे पाचट टाकले जाते. म्हणजे पावसात कांद्यावर पाणी गळत नाही. आजूबाजूला कपाशीच्या सोट्यांच्या कवाड्या (ताट्या) करून ती उघडता-लावता येईल अशी सोय केलेली असते. अशा या विशिष्ट वास्तूला कांद्याची चाळम्हणतात. खेड्यातील शेतकरी कितीही गरीब असला, तरी या चाळीत तो घरासारखे राहायला जात नाही. राहण्यासाठी त्याचे वेगळे घर असते.    
            म्हणून बटाट्याची चाळहा शब्द आम्ही ऐकताच आमच्या डोळ्यांसमोर कांद्याची चाळउभी राहिली. कांद्यांची चाळअसते तशी बटाट्यांची चाळअसावी, असा साहजिक आमचा समज झाला आणि यात हसण्यासारखे वा विनोदासारखे आम्हाला काहीच वाटले नाही. उलट अचंबा वाटला की, धड्यातील वर्णनानुसार या पात्रांची आर्थिक-सामाजिक परिस्थिती चांगली असूनही मुंबईसारख्या मोठ्या शहरात हे लोक बटाट्याच्या चाळीतका राहात होते!
            हा धडा शिकविण्याआधी, शहरात चाळनावाचा एक घर प्रकार आहे, तो कसा? कशाला चाळ म्हणतात? हे आम्हाला स्पष्ट करून सांगणे शिक्षकाचे कर्तव्य होते. ते त्यांनी केले नाही म्हणून हा सर्व गोंधळ होत होता. जेव्हा प्रौढ वयात शहरात आल्यावर चाळनावाचा घरांचा प्रकार आम्हाला समजला तेव्हा तर आमचे आख्खे खेडेच एक चाळअसते असेही लक्षात आले.
            बटाट्याची चाळच्या समजावरूनच इयत्ता पहिलीतील मुळाक्षरे शिकण्याच्या वेळी माझा झालेला गोंधळही आठवला. मुळाक्षरे शिकविण्याच्या पद्धतीतील शहरी दृष्टिकोन ग्रामीण मुलांवर लादल्यामुळे ग्रामीण मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. अभ्यासाविषयी त्यांच्या मनात आकस निर्माण होतो. उदाहरणार्थ, ‘अननसहे कोकणातील फळ आज सर्वत्र पाहायला मिळत असले तरी तीस-चाळीस वर्षांपूर्वी बागलाण तालुक्यातील विरगाव या ठिकाणी हे फळ पाहायला मिळणे कधीच शक्य नव्हते. तरीही शाळेत अ - अननसाचाअसेच आम्हाला म्हणावे - शिकावे लागत होते. अननसहे काय असते, कसे असते, हे वडील धाडील मंडळीलाही सांगता येत नव्हते. फक्‍त शिकताना अ - अननसाचाम्हणण्यापुरतेच अननसाचे स्थान आहे का? हेही स्पष्ट होत नव्हते. शिक्षक आपण होऊन असे शंकानिरसन करत नव्हते. ग्रामीण भागात तेव्हा शिक्षकांबद्दल इतका धाक असायचा की दहावीत शिकणारे विद्यार्थीसुद्धा शंका विचारणे टाळत असत तर पहिलीतल्या मुलाची कल्पनाच केलेली बरी.
            ग्रामीण व शहरी भागात सर्वत्र जी वस्तू (फळ, पदार्थ, धान्य, पशू, पक्षी) माहीत असेल अशा गोष्टींचा उल्लेख करून पाठ्यपुस्तके तयार व्हायला हवीत. पण तसे होताना दिसत नाही. खरे तर शिकवताना अ - अडकित्त्याचाम्हणता येऊ शकले असते. अथवा अजगराचाही म्हणता आले असते. अडकित्ताअजगरग्रामीण व शहरी ह्या दोन्ही भागात पाहायला मिळू शकतात. पण आम्ही पहिलीत होतो तेव्हा असे घडले नाही.
अजून काही उदाहरणे देता येतील.
मुळाक्षरे      पुस्तकातील वस्तूंची नावे    सार्वत्रिकेसाठी काय हवे     
          अननस                        अडकित्ता/अजगर   
          आगगाडी                 आरसा/आई 
           इजार/इरले               इस्तरी/इमारत     
           ईडलिंबू                  ईश्वर/ईद    
           एडका                    एक  
अं          अंबारी                   अंग/अंगण/अंजीर  
          जहाज                   जव/जमीन  
          फणस                   फराळ/फटाके
           भजन                    भगर/भवरा (भजन सुध्दा इथे चालेल)    
           मगर                    मका/मध   
           यज्ञ                     यम/यळकोट 
           रथ                      रवा  
           शहामृग                        शरद 
           हरण                    हरबरा
क्ष          क्षत्रिय                   क्षण  

            सार्वत्रिक समजतील अशा वस्तूंची नावे पुस्तकात दिली तर प्राथमिक शिक्षण सोपे होऊन विद्यार्थ्यांना शिकायची आवड निर्माण होऊ शकते. अजगर, आरसा, आई, इमारत, अंग, अंगण, अंजिर, भवरा, मका, मध, शरद, क्षण हे शब्द अलीकडील काही गाईड अंकलिप्यांमध्ये मूळ जड शब्दांना पर्यायी शब्द म्हणून दिलेले दिसत असले तरी तीस-चाळीस वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. म्हणून आमच्या पिढीतील प्राथमिक शाळेत शिक्षण घेणार्‍या मुलांची खूप कुचंबणा झाली. अननससारख्याच आगगाडी, इजार, इरले, ईडलिंबू, एडका, अंबारी, जहाज, फणस, मगर, यज्ञ, रथ, शहामृग, हरण, क्षत्रिय या गोष्टी आमच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक नव्हत्या आणि बर्‍याचशा पाहण्यातही नव्हत्या. शिक्षक म्हणतात म्हणून आम्ही म्हणायचो, ‘श - शहामृगाचाअथवा आ - आगगाडीचा’.  पण आगगाडीकशी असते? तर पुस्तकातल्या चित्रात दिसते तशी. या पद्धतीने दुधाची तहान आम्हाला ताकावर भागवावी लागत असे.
            या अनुभवांती आजच्या ग्रामीण-आदिवासी मुलांना मनःपूर्वक आणि मूलभूत शिक्षण द्यायचे असेल तर त्यांच्या रोजच्या परिचित वस्तूंपासून व त्यांच्या मायबोली भाषेतूनच ते सुरू करायला हवे, तरच शिक्षणाची गोडी लागेल व आपण त्यांना शिक्षित करण्यात यशस्वी होऊ शकू.
            (पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या अहिराणीच्या निमित्ताने: भाषा या माझ्या पुस्तकातून साभार. या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६

शेजारनी जीजी (अहिराणी कथा)





- डॉ. सुधीर रा. देवरे

          विरगावले आमना घरनाआडे तुळसा बोय राहे. तिले आम्ही जीजी म्हनूत. जीजीले दोन आंडरो व्हतात नि दोन आंडरी. दोन्ही आंडरीसना लगनं व्हयी जायेल व्हतात म्हनीसन त्या त्यासना सासरले व्हत्यात. दोन्ही आंडरोबी बाहेर राहेत. येक सर व्हता म्हनीसन बदलीना गावले राहे ते दुसरा शेतकरी म्हनीसन दूर वावरात राहे. जीजीना घरना मानोस मालेबी आठवत नही तैन्हपशी गमी जायेल व्हता. म्हनून घरमा जीजी येकटीच राहे. याळभर याना नहीथे त्याना वट्टा दुखाडी जीजी नुसता चावळाना गाडा भरी राहे.
                        आमना घरना मांगे आड व्हता. त्यावर आजूबाजूना खंडीभर घरं पानी भरेत. पेवापशीन ते वापरसापरकर्ताबी आडनंच पानी वापरनं पडे तैन. रहाटले दोर बांधी रहाट वढीसन पानी भरनं पडे. जीजी म्हतारी बोय व्हती. तिनं वय व्हत वनं व्हतं. कोनी कोनी तिले धैडीबी म्हने. तिले काय रहाट्य वढीसन आडनं पानी भरता इये ना. म्हनीसन जीजीले कोनीबी आडवर पानी भराले इयेल बाई येखांदी बादली पानी दि दिये. तिले हातमा रहाटे धरानी येळ इये ना. जिजी आडवर रिकामी घागर ठी जाये आनि बागेचकशी भरेल घागर उचली घी जाये.  
                        संध्याकाळे चिपडं पडानं येळे मी आमना वट्टावर बसू तधळ जीजी तिन्हा वट्टावर दारनं मोर्‍हे बशेल राहे. जीजी तठोनच माले इचारे,
हाऊ हेट्या चालना हाऊ कोन शे रे भाऊ ? 
मी सांगू, गोटू काका.
जीजी म्हने, माले ते तो भागा मोहननागत दखास.
जीजीना माले आशा येळे भलता राग इये. जीजीनी नजर अधू व्हयी र्‍हायनी व्हती. मंग आपू कोनले इचारं ते त्यानावर भरोसा ठेवा ना. पन नही. जीजी काय इस्वास ठिये ना. म्हनीसन मी बी कतायी जाऊ. आखो जीजीनी इचारं का,
हाऊ हेट्यातीन वना हाऊ कोन शे रे भाऊ.
मंग मी बी हाटकून खोटं सांगू, राजाराम येसोद. पन तो राहे, दादा सातारकर.
बहुतेक मन्ह हायी खोटं बोलनं तधळ जीजी वळखी घीये. मंग जीजी जरासा दम खाई मोर्‍हे का बोलेना. पटकशी काही सोदेना. जागेच मटरायी बशी राहे. पन जीजीनी आश इचारानी खोड का कायमनी मुडेना.
            मळाकडथून येनारं कोनं बैलगाडं मारोतीना पारजोडे दिसनं नहीथे नुसत्या बैलस्न्या गेजास्ना आवाज वना तरी जीजी माले इचारे,
हायी कोनं गाडं वनं रे भाऊ .
मी म्हनू, काय वळखू येत नही.
तवशी जीजी म्हने, पभानं ते नही.
मी सांगू, पभा काय दखात नही पन गाडावर.
जीजी म्हने, त्याना सालदार व्हयी मंग.
मी मगज दिऊ ना. मी सांगाले कटाळा करस हायी जीजीना ध्यानमा यीसनबी जीजी काही इचारानं सोडेना.                       
            मी संघ्याकाळे आमना वट्टावर बशीसन कधळ मधळ अहिरानी लोकगीतं म्हनू, गाना म्हनू, गीतानी प्रार्थना बी म्हनू.
ओम पार्थाय प्रतिबोधिता
भगवता नारायनेनम स्वयम
व्यासेन ग्रथिता पुरानमुनिना
मध्यमहाभारतम्...
जीजी हायी प्रार्थना कान टवकारीसन आयकी राहे. येकांददाव जीजी मंग व्हयीसन माले ती प्रार्थना म्हनाना धट लाये, 
ते तू काय म्हनस ते म्हन रे भाऊ. कानस्ले ते भयान गोड लागस.
जीजीनी रमाइश आयकीसन मालेबी बरं वाटे आनि आखो मी ती प्रार्थना म्हनू. जीजी आमनी कोनी सगीसोयरी लागेना. चुलतमुलत दूरनी नातेवाइकबी नव्हती. फगत शेजारीन व्हती. तरी आमना घर कोनी नसनं ते तिन्हा भयान आधार वाटे आमले. पन जीजी कायम आमना सोबत चांगलीच वागे आशे अजिबात नही बरका. बराचदाव ती बिनवायकारनी हिटफिट करे. मी भवरा भवरा खेळी र्‍हायनू आनि भवरा जर गरबडत तिन्हा वट्टावर गया ते जीजी लगेच दनकारे, वट्टा उचडयीनारे. खाल गल्लीमा खेळतन.
            जीजी थाइन बाहेरतीन वनी आनि मी आमना वट्टावर मन्हा सोबतीससांगे खेळतबिळत दिसनू, त्ये मंग जीजी तिनं घरनं दार उघाडाना आगोदर डोळा वटारीसन तिन्हा वट्टा आठूनतठून निरखी पाहे. कुठे तरी कैन्हना येकांदा कोपरा बिपरा उचडेल धशेल पाही टाके आनि तशे उचडेल दखाताच जीजी पटकशी डाच्च करे,
हाऊ खड्डा कोनी पाडा व्हयी काय मा आठे.
जीजी आशी शिमर्‍या ताना लागी का मंग मीबी कतायी जाऊ. जीजीना मनले बरं वाटाले पाहिजे म्हनीसन मी बी तो खड्डा नहीथे उचडेल वाचडेल पाहताजोताच म्हनू, बाबाबा, येवढा मोठा खड्डा कोनी कया व्हयी भो आठे?
जीजीले मन्ह नकली वागनं बोलनं समजी जाये. आनि आपलं काय आता हसू करी घेवा म्हनीसन जीजी गडीगुप घरमा निंघी जाये. सांगयी कोनले?
             आमोश्यानं संध्याकाळे घरोघरना पोर्‍यासोर्‍यास्ले कनीकना दिवा मारोतीले घी जाना पडेत. काबरं बिबरं ते काय माले ठाऊक नही भो. पन विरगावले तशी परथा व्हती. आमना घरना त्या दिवा घी जावानं काम मन्हाकडे व्हतं. तधळ जीजी माले म्हने,  
दिवा घालाले जाशी तधळ मन्हाबी दिवा घी जाय बरका भाऊ. 
मी जीजीना दिवा घी जाऊ. जीजीले घासतेल आननं जयं ते दारात बशी मन्ही दुकानात जावानी जीजी वाट पाही राहे. मी दुकानात चालनू आशे जीजीनी पाह्य का लगेच माले म्हने,
भाऊ मन्ह येवढं घासतेलबी घी येतनी. मी घासतेल आनी दिऊ. जीजीनं काम र्‍हायनं ते जीजी भाऊदादा करे.
            पुढलं शिक्षान आनि नोकरीना निमितखाल मन्ह गाव सुटी गयं. आझारमझारतीन मी घर जाऊ तधळ जीजी मन्ही इचारपुस करे. मन्ह कशे काय चालनं ते इचारे. आशाच येकदाव विरगावले गऊ तधळ जीजीनी माले घर बलायी घिदं. चावळता चावळता जीजीनी च्या करी आना. मी म्हंतं,
नको जीजी च्या कसाले कया?
जीजी म्हने, घे रे भाऊ, साखरना शे ना. घे उकाव.
माले हासू वनं. जीजी आजूनबी जुना काळमाच जगी र्‍हायनी व्हती. पाव्हना रावळा वनात तैन्हच त्या काळमा खेडापाडास्वर साखरना च्या व्हये. नहीते घरेदारे गुळनाच चहा व्हये. साकरना चहा पेतस त्या लोक शिरीमंत र्‍हातंस आशे वाटे तैन्ह मले. गुळना चहा व्हयी, आशे माले वाटनं व्हयी आशे म्हनीसन मी पेतबीत नशे, आशे तधळ जीजीले वाटनं व्हतं.
            जीजी येक दिवस जरासा आजारनं निमितखाल गमी गयी म्हने, हायी गोट माले बराच याळमा शहरमा कळनी.
            माले आजूनबी मन्ह ल्हानपन जशेनतशे याद येस. आमनं जुनंपानं किलचननं घर, घरम्होरला शेनवरी सारवेल नहीथे सडा टाकेल वट्टा, मांगलदारना चंद्र्यासनी वडांगना वाडा, तैन्हबी भयानच खोल वाटे आशा आड, मन्हा जुना घरना शेजारनं जीजीनं जुनं घर आशे गंजनच जशेनतशे डोळासमोर येस. जीजीनीबी याद येस. गल्ली सोबतीसनी याद येस. जीजीना आंडरोबी आता दर वरीसले ध्यानात ठीसन जीजीना पित्तर घाली देतंस. सनसुदना याळले तिन्हा नावना चुल्हामा एक घास टाकी देतंस.
जीजीन काय सगळास्नी जत्रा आशीच निंघी जास... आपला नंबर कैन्ह लागयी हायी आपू मनवर घेत नहीत... आपू धुंदीमा जगी र्‍हातस...
      (पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या अहिराणी गोत या माझ्या  पुस्तकातून साभार.  या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/