रविवार, २९ एप्रिल, २०१२

असोनी ठग तरी म्हणावे संत !!!

असोनी ठग तरी म्हणावे संत !!!

                                                                        - डॉ. सुधीर रा. देवरे

जो जो कोणी भगवे कपडे परिधान करून आश्रमांच्या नावाने अलिशान अशा प्रचंड महालात राहत असेल, उठसुठ विमानाने प्रवास करत असेल, आधुनिक सुखसोयींयुक्त गाड्यांतून फिरत असेल, भक्तांकडून वेगवेगळ्या पध्दती वापरून पैसे घेत असेल अशा व्यक्तिला संत म्हणता येईल का? भगवे वस्त्रे नेसून, दाढी वाढवून संताचे सोंग घेणारा सर्वसामान्य लोकांना लुबाडतोय तरीही लोकांच्या श्रध्दा का दुखवायच्या म्हणून आपण कायम गप्प बसावे का?  

आपण महान आहोत, आपल्याला सिध्दी प्राप्त झालीय, आपल्या आ‍शीर्वादाने पाप धुतले जाते, आपण लोकांचे दु:ख दूर करू शकतो, आपल्या योगांनी आयुष्य वाढते वा शारिरीक व्याधी दूर होतात, असे जो जो कोणी म्हणत असेल- ज्याला अशी बाधा झाली असेल तो भगवी वस्त्रे नेसत असला काय अथवा भगवी वस्त्रे परिधान न करता स्वत:ला संत म्हणवून घेत असेल तर अशा सर्व तथाकथित संतांना आपण ठग का म्हणत नाहीत? संत का म्हणतो?

आणि जे जे लोक अशा संतांमागे धावतात, त्यांना भजतात, त्यांचा सत्संग करतात, ज्यांना या संतामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होण्याचा आभास होतो, असे संत ज्यांच्या स्वप्नात येतात अशा सर्व भक्तांना शासकीय पातळीवर मानसिक संतुलन बिघडलेले मनोरूग्ण ठरवून त्यांच्यावर शासकीय खर्चाने योग्य तो इलाज का करू नये? इतक्या साथींच्या आजाराचे निर्मुलने शासकीय पातळीवर होत असतात. विविध आजार प्रतिबंधक लसी टोचल्या जातात. मग शासन मनोरूग्णांनाच का असे वाय्रावर सोडून देते? 

   - डॉ. सुधीर रा. देवरे

असोनी ठग तरी म्हणावे संत !!!