सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

‘अहिरानीना आगाजा’ (संपादकीय)

  

- डॉ. सुधीर रा. देवरे

 

                    राम राम मंडळी. अहिरानीना आगाजाना हाऊ पहिला अंक. अहिरानी कर्ता आशे ई-मॅगेजीन काढानं कैन्हनं चालनं व्हतं. पन आताशी आठे मोर्त लागना. बराच जनस्नं म्हननं व्हतं, उलसं का व्हयेना पन ते नियतकालिक दर मयनाले निंघाले पायजे. म्हनीसन आता अहिरानीना आगाजा हायी मासिक दर मयनानी पयली तारीखले आपूले वाचाले मिळयी.          

                    अहिरानी ढोल नियतकालिक संपादनना मिळेल आनंद सोबत ऱ्हावामुळे आनि (येळ नसना तरी त्याच येळमा येगळा येळ काढीसन) अहिरानी भाशा आनि लोकजीवन जतन कराकर्ता हायी हालकं फुलकं मासिक आम्ही अहिरानी भाशा बोलनारा सगळाजन चालू करी ऱ्हायनूत. ढोल नियतकालिक भारतीय लोकभाषा सर्वेक्षनमा पघळी गयं तैनपशी आशे यंखादं अहिरानी भाशानं नियतकालिक चालू कराना इचार करी ऱ्हायंतूत. संपृक्त लिखाण नावनं नियतकालिक चालूबी कयं. पन त्यामा याना मोर्‍हेबी फगत अहिरानी भाशानं साहित्य राहनार नही, मराठी आनि बाकीन्या भाशा, बोलीबी र्‍हातीन. आखेर ई-मॅगेजीन सरुपमा हायी अहिरानीना आगाजा मासिक आजपशी दर महिनाले चालू व्हयी ऱ्हायनं. दर महिनाले निंघई म्हनीसन ह्या मासिकनी पानस्नी संख्या कमी ठियेल शे. त्यानामुळे लेखकस्नी आपलं भाशाबद्दलनं म्हननं आनि साहित्य याना मोर्‍हे थोडकामा ल्हिसन धाडं त्ये बरं व्हयी.

                    अहिरानी नाद मंडळ कडथायीन तशेच ढोल नियतकालिक मजारतीन दोन हजार येक आनि दोन हजार आकरानी जनगननानं येळे आम्ही अहिरानी बोलनारा सरवा भाऊ बहिनीस्ले हाक दिसन रावन्या कया व्हत्यात... जनगननाकर्ता ज्या कोनी मानसं आपला घर माहिती इचाराले यीतीन, त्यास्ले तुमनी मायभाशा अहिरानी शे, आशे हाटकून सांगा आनि तशे त्यासले त्यास्ना जोडेना कागदवर लिव्हालेबी सांगा. अहिरानी पट्टामजारला सरवा लोक आज जागा व्हयी गयात. आनि दोन हजार येकवीसपशी आतापावत परभारे आशा परचार लोक आपोआप करा लागात. मीडियावर आशा पोस्ट दखावा लाग्यात. हायी दखीसन भयान आनंद व्हयी र्‍हायना. हायी चालू जनगननामाबी ज्यानी त्यानी आपली अहिरानी भाशा हाटकून नोंदवा हायी आखो येकदाव रावनाई. ‍ि  

                    मासिकबद्दलनी दवंडी वाचीसन ई-मेल आनि व्हाटसअपवर भयान परमानखाल मसनच साहित्य येवा लागं. त्यामातलं निवाडीनुवाडी काही बरं साहित्य ह्याना पुढला अंकस्माबी देवानी कोशीश राही. सगळंच साहित्य दरजेदार- भयान मस्त आशे जरी यामा दखायनं नही तरीबी अहिरानी भाशानी गोडी वाढयी, अहिरानी लोकजीवननं दर्सन दखायी, ह्या मातलं साहित्य आपुले येगळी नजर दी, आशा भरोसा वाटस. तशेच दर खेपे नेमकं साहित्य येचीसन आठे देवानी कोशीश ऱ्हायी. आतानी पिढीना पोरंसोरंस्ले अहिरानीनी गोडी लावाकर्ता- त्यास्ले उचली धराकर्ता पयला काही अंकस्मा बरंमाठं साहित्यबी आपुले वाचनं पडयी, त्याले इलाज नही.

                    बठ्ठा अहिरानी भाशा बोलनारा भाऊ- बहिनीस्नी ह्या कर्ता आपलं अहिरानी साहित्य धाडवा. ह्या साहित्यमा लोकजीवन, लोकपरंपरा, लोकसंस्कृती, लोककथा, भाशा, कविता यास्ना इचार व्हयी. आपलं साहित्य sudhirdeore29@yahoo.com या ईमेलवर नहीथे 8275559694 या व्हाटस पवर धाडनं शे.

                    अहिरानीना आगाजा मासिकना आखेरना काही पानं अहिरानी बुलेटिन म्हनीसन जोडेल ऱ्हातीन. ह्यामा अहिरानी पट्टामजारल्या काही इशेश येगळ्या घटना, आगळ्या बातम्या, भाशाना निवेदनं यास्नामाळेक काही मजकूर ऱ्हायी. ह्याकर्ताबी आपलाकडला मजकूर धाडवा.

                    अहिरानी शब्दकोशनंबी काम चालू व्हयेल शे. हायी काम आपुले आपली भाशा जतन कराकर्ता सोता आनंद घीसन करनं शे. दुसरं कोनाकर्ता करनं नही. त्याकर्ता कोनले अहिरानी भाशा मजारला अडगळमा पडेल- याळेयाळ दवडी चालनात आशा दुर्मीळ शब्द धाडना व्हतीन त्ये त्याबी हाटकून धाडा. पन फक्त येक येक दोन दोन आशा शब्द धाडू नका. आशा शब्द आपला सोताकडे संगाळीसन सावटा शब्द गोळा जयात का मंग त्या शब्द येकदम धाडा. (डॉ. सुधीर देवरे, श्री. एम. के. भामरे, डॉ. नरेंद्र खैरनार, डॉ. फुला बागुल, श्री. बि. एन. चौधरी, सौ. लतिका चौधरी, सौ. वनमाला पाटील ह्या हायी काम करी राह्यनात.)  

                    ह्या ई-मासिकना सहसंपादक म्हनीसन श्री. एम. के. भामरे, श्री. रमेश धनगर, श्री. प्रमोद कुवर, श्री. जनार्दन देवरे, श्रीमती श्रध्दा गुजराथी ह्या सोबती काम पाही ऱ्हायनात. आपलं साहित्य त्यास्नाकडे पैभारं धाडं तरी चालयी. हायी ई-मॅगेजीन दरमहिनानी येक तारीखले उजेडमा आनानी (प्रकाशित करानी) जोखीम श्री. विकास पाटील (उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ) यास्नी उचलेल शे. ह्या बठ्ठास्ना आभारी शाऊस. राम राम.

                    (‘अहिरानीना आगाजा - ऑगष्ट २०२२ ह्या पयला अंकले लिहेल संपादकीय. कथं पैभारं धाडनं व्हयी त्ये लेखकनं आनि ह्या ब्लॉगनं नावबी लिव्हा हायी रावनाई.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/