-
डॉ.
सुधीर रा. देवरे
संरक्षण मंत्री:
(संसदेत) सीमेवर दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला.
विरोधी पक्ष:
(संसदेत) तुम्ही भारताकडून आहात का पाकिस्तानकडून?
संरक्षण
मंत्री: (संसदेत दुसर्या दिवशी) पाकिस्तानी सैन्यानेच हल्ला केला.
भाजप: काँग्रेसच्या सत्ता काळात सगळ्यात जास्त सैनिक शहीद झाले.
काँग्रेस: नाही. भाजपच्या सत्ता काळातच सर्वात जास्त सैनिक शहीद झाले.
भाजप: नाही. आम्ही हे सिध्द करून देऊ शकतो की काँग्रेसच्या काळातच
जास्त शहीद झाले.
काँग्रेस: तर हे घ्या आकडे. भाजपच्या काळात रोज 874 बळी गेले तर काँग्रेसच्या
काळात रोज 15 बळी जातात. 6
ऑगष्टला तर फक्त पाचच बळी गेलेत !
बिहारी मंत्री: सैनिक शहीद होण्यासाठीच असतात. कारण ते वेतन घेतात.
मग ते कशाही पध्दतीने शहीद
होवोत.
बाकी पक्ष: काही इकडून. काही तिकडून.
भारतातले नागरीक: हताशतेने राजकीय नाटक पहात आतल्या आत रडतात.
उदास होत राहतात.
पाकिस्तान: भारतातच भारत-पाकिस्तान पाहून पोट
धरून हसत टाळ्या देतो-
टाळ्या वाजवतो...
असे हे सहानुभूतीचे नाटक खेळत
भारतातील राजकीय पक्ष आपले हसू करून घेतात. यांना देशाच्या सार्वभौमत्वावरही एका
आवाजात बोलता येत नाही हे भारतीय नागरीकांचे दुर्दैव. स्वत: भारत आणि दुसरा राजकीय
पक्ष पाकिस्तान असे भासविण्याचा प्रयत्न सगळेच राजकीय पक्ष करत आहेत. आपण कोणत्या
पात्रतेच्या लोकांना निवडून संसदेत पाठवतो यावर आता नागरीकांनाच विचार करावा
लागेल.
पाकिस्तानने किती वेळा भारताची
कुरापत काढली याची आपण फक्त बेरीजच करत बसायचे का? कारवाई का करायची नाही? कारवाई
म्हणजे युध्द नव्हे. आणि भारतातील कोणत्याही सुज्ञ नागरीकास युध्द नकोच. पण अशी
काही घटना घडली तर कमीतकमी सगळ्यांनी एका आवाजात तरी निषेध करा. ज्या ठिकाणी अशी
घटना घडते त्याच ठिकाणी प्रत्युत्तर म्हणून तेवढीच कारवाई करायला सैनिकांना
परवानगी द्या. अशी कारवाई म्हणजे युध्द नव्हे. असे प्रत्युत्तर त्या त्या वेळी
मिळाले तरी पाकिस्तानला दहशत बसू शकते. पाच जवानांच्या मृत्यूनंतर 24 तासाच्या आत
भारताकडून त्याच ठिकाणी तसेच उत्तर दिले जायला हवे होते. पण तसे अद्याप काहीही
झालेले नाही.
- डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
My another 3 BLOGs on Pakistan issue : links
given below:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा