-
डॉ.
सुधीर रा. देवरे
कोणी
दाखवतं तर कोणी लपवतं. पण अपंगत्वाच्या वेदना या सगळ्या आयुष्याला वेढून असतात.
आपलेच ओझे ओढत आयुष्यभर सामान्यपणे वावरणे ही साधीसुधी गोष्ट नाही. अशा अनेक
समस्यांना समोरे जात स्वावलंबी होण्यासाठी पायाने अस्थिव्यंग असणार्या माणसाने
अधिकृत वाहन बनवले तर त्या वाहनाच्या पासींगसाठी त्याला भली मोठी अडथळ्यांची शर्यत
पार करावी लागते. मुख्य परिवहन अधिकारी श्री. अमर पाटील यांच्यासारखे काही सहृदय व
समजूतदार लोक सोडले तर अपंगांच्या अडचणी कोणी समजून घ्यायलाच तयार नाही.
अपंगाला
गाडी पासींग करायची वा लायसन्स काढायचे असेल तर त्याला थेट हाजीअली मुंबईचे
प्रमाणपत्र आणायला सांगितले जाते. पण शासकीय जिल्हा चिकित्सालयाच्या मुख्य
वैद्यकीय अधिकार्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरावे असा जीआर असूनही तो संबधितांना
माहीत नाही. मुख्य आरटीओ ऑफिस, मुंबई हाजीअली, जिल्हा चिकित्सालय अशा ठिकाणी चार
चार वेळा अपंगांना खेटे घालावे लागतात. असे खेटे घालत असताना - प्रमाणपत्रे मिळवत
असताना पासींग नको आणि हे जीणेही नको असे अनुभव अपंगांना येत असतात.
अशा पासींगसाठी सीव्हील सर्जनचेच नव्हे
तर ग्रामीण भागातील कोणत्याही खाजगी अस्थिव्यंग सर्जनचे प्रमाणपत्रही यापुढे ग्राह्य
धरावे अशा आशयाचे इमेल मी केंद्र सरकार- दिल्ली, महाराष्ट्र सरकार- मुंबई व सर्व
राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पाठवले होते. त्याला यश येऊन नुकताच दिनांक 12 जून
2013 ला महाराष्ट्र शासनाने अद्यादेश काढला आहे, तो असा:
अशा
प्रकारच्या पासींग व लायसन्ससाठी सर्व ग्रामीण व तालुका शासकीय रूग्णालये व शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रमाणपत्रेही यापुढे ग्राह्य धरले जावेत. यापुढे
मुंबईच्या प्रमाणपत्राचा आग्रह धरू नये.
मी
जो इमेल सर्वत्र पाठवला होता. तो खाली देत आहे:
Painful
Sir,
Some points send about disabled persons which would be discussed to your end please. And think
on it seriously.
1)
Disabled
person means life time problems.
2)
For
getting driving license, Vehicle Passing or getting permission for modifying authorized
vehicle from RTO, there is very bad harassment from RTO office.
3)
All Taluka
placed medical officers or private practitioners who are qualified orthopedic surgeon would have authority for
giving the medical certificate in which fitness of the handicapped person would
be mentioned. So this authority would not be given to only for civil surgeon of
district level. Because of it disabled persons are unable to moving here and
there more. And these persons (Disabled)
may suffer from different problem while going through the way of government to
gain driving license.
-
डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा