-
डॉ.
सुधीर रा. देवरे
1985 ते 1989 या काळात राजीव गांधी भारताचे पंतप्रधान झाले
आणि भारतातले सगळे आणि आंतराष्ट्रीय प्रश्न सुध्दा आपण चुटकीसरशी सोडवू शकतो असे
त्यांना वाटू लागले. श्रीलंकेत शांती सेना पाठवण्यापासून तर पंजाब प्रश्नावर तोडगा
काढून प्रश्न निकालातच निघाला असे जाहीर करण्यापर्यंतचे निर्णय पटापट घेऊन समस्या
सुटली असे ते मानू लागलेत. त्यातच सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आला.
शहाबानो या तलाकपिडित महिलेला तिच्या नवर्याने पोटगी
द्यावी असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. या न्यायालयाच्या
निर्णयाने भारतातील काही मुल्ला बिथरले आणि न्यायालयाने आमच्या धर्मात हस्तक्षेप
करू नये असे ते एका सुरात बोलू लागले. मुल्ला आणि मुस्लीम धर्मगुरूंनी राजीव
गांधींची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. या मागणीला बळी पडून राजीव गांधींनी संसदेत
विधेयक मांडले की कोणत्याही तलाकपिडित मुस्लीम स्त्रीला नवर्याकडून पोटगी मागता
येणार नाही. तिने मागणी केल्यास वफ्फ मंडळ तिला आर्थिक मदत देईल. काँग्रेसला
इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर सहानुभूतीच्या लाटेवर मिळालेल्या प्रंचड बहुमतामुळे व्हीप
काढून हे विधेयक तात्काळ मंजूर करून घेता आले. या कायद्यामुळे एकविसाव्या शतकाच्या
गप्पा मारणार्या राजीव गांधींनी भारताच्या महिलांना एकदम सोळाव्या शतकात ढकलून
दिले. राजीव गांधीची ही पहिली सर्वात मोठी चूक ठरली.
त्या वेळी लोकसभेत
विरोधी पक्ष असा नव्हताच. पण नागरीकांसह काही वृत्तपत्रांनी या निर्णयावर विरोधी
बोलायला- लिहायला सुरूवात केल्यामुळे आपण हिंदुविरोधी आणि मुस्लीमधार्जिणे आहोत ही
आपली प्रतिमा बदलण्यासाठी राजीव गांधींनी यापेक्षा एक भयाणक निर्णय घेतला:
अयोध्येतील रामजन्मभूमीचा वाद जो सर्वोच्च न्यायालयात निकालासाठी पडून होता आणि
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ती जागा कुलूपबंद होती. राजीव गांधीनी ही जागा
एका फटक्यात हिंदूसाठी पूजेला खुली करून तिथे राममंदिराचा शिलान्यासही स्थापन करून
टाकला. ही राजीव गांधींची दुसरी मोठी चूक ठरली.
राम मंदिराच्या शिलान्यासाचा धागा पकडून
भारतीय जनता पार्टीने मंदिराचा भावनिक
प्रश्न बनवून देशभर राजकारण सुरू केले. हिंदूची श्रध्दा कॅश करण्याच्या नादात
भारतीय मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा खेळ सुरू झाला. 1985 ला फक्त देशभरातून दोन
जागा मिळविणारा भाजप 1989 ला या प्रश्नावर 85 जागा घेऊन सत्तेला बाहेरून पाठींबा
देणारा प्रमुख पक्ष ठरला. राम जन्मभूमीचा प्रश्न आपल्याला सत्तेपर्यंत घेऊन जाऊ
शकतो असे लक्षात येताच या खेळात एके दिवशी बाबरी मशीद पाडली गेली.
भाजपच्या सत्ता समीकरणाने 1991 ला 121 जागा नंतरच्या
निवडणूकीत 161 जागा मिळवत त्यांना सत्ता मिळालीही, पण भारताच्या धर्मनिरपेक्षतेला
या काळात सुरूंग लागायला सुरूवात झाली. या हिंदू उग्रतेच्या पार्श्वभूमीवर मुंबई
दंगल, मुंबई बाँबस्फोट, देशभरातील दहशतवादी कारवाया, काश्मीर खोर्यातील अशांतता, गोधरा
प्रकरण आणि त्यानंतर गुजरात दंगल या सगळ्या घटना देशाला लांछनास्पद ठरल्या आहेत.
यांचा फायदा घेत पाकिस्तानने खुल्या पध्दतीने कारगीलही घडवून आणले.
आजच्या या धार्मिक उग्रवादाचे मूळ 1985 ते 1989 या राजीव
गांधींच्या काळात पहावे लागेल. राजीव गांधींनी या दोन चुका केल्या नसत्या तर
कदाचित आज आपल्या देशातील राजकीय पक्षांचे राजकारण धर्म आणि जातीच्या भावनिक श्रध्दांमध्ये
न अडकता विकासाच्या घोषणांनी अधिक प्रगल्भ झाले असते, असे म्हणायला जागा आहे.
- डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
"या हिंदू उग्रतेच्या पार्श्वभूमीवर मुंबई दंगल, मुंबई बाँबस्फोट, देशभरातील दहशतवादी कारवाया, काश्मीर खोर्यातील अशांतता, गोधरा प्रकरण आणि त्यानंतर गुजरात दंगल या सगळ्या घटना देशाला लांछनास्पद ठरल्या आहेत."
उत्तर द्याहटवामला वाटते, या घटनांना हिंदू उग्रतेची पार्श्वभूमी प्रदान करून इस्लामी कट्टरवादाकडे कानाडोळा करून पाकिस्तानच्या कारवायांना तुम्हीही उत्तेजन देत आहात.
स्थापनेपासून भारताच्या अस्मितेला सुरुंग लावुन या लोकशाही देशाचे अस्तित्व नष्ट करण्याच्या पाकिस्तानच्या मनसुब्यांना खतपाणी घालणारे हे वक्तव्य आहे. भारतातील दहशतवादी कारवाया भारतानेच घडवून आणल्या आहेत असे नाहीतरी पाकडे उघडपणे जगाला ओरडून सांगत आहेत, त्यांना तुम्ही बळ पुरवताय आणि मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करून हिंदूंच्या कारवायांना दहशतवादाचे मूळ मानताय हि घोर चूक तुम्हीही करताय.
राजीव गांधीनी केलेली चूक दाखवताना तुम्हीही सनातन काँग्रेसी चूक करू नका.
नाईक जी तुम्ही मांडलेला मुद्दा १०० % खरा आहे ..... देवरेंच केलेला वक्तव्य चुकीचे आहे
हटवादेवरे साहेब भारतातील अशांततेचे मूळ मागील ५०-६० वर्षातील इतिहासात शोधण्याचा प्रयत्न करत आहेत ..पण त्यांना या गोष्टीचा विसर पडतो आहे कि भारतातील अशांतता हि इ. स. १२ व्या शतका पासून जेन्वा मुस्लीमानी भारतावर आतिशय क्रूर आक्रमण सुरु
केली त्या काळापासून पासून भंगलेली आहे............
बाबरी मशीद बद्धल लिहिताना त्या बरोबर मुस्लिमांनी भारतातील उद्धवस्त केलेल्या ५०-६० हजार प्राचीन मंदिरा बाबत हि लिहित चला .......
खाली उदाहरण म्हणून फक्त एका औरंगजेबाने धूळदान केलेल्या काही मंदिरांची लिस्ट आहे jarur wacha
Destruction of Hindu Temples by Aurangzeb
http://www.hindunet.org/hindu_history/modern/temple_aurangzeb.html
सुधीरजी आपल विश्लेषण हे माझ्या ददृष्टीकोनातून बरोबर नहि.
उत्तर द्याहटवा१. इस्लाम हा धर्म स्थापनेपासून ज्या पद्धतीने वाढला आहे त्यात हिंसा मोठ्याप्रमाणावर जबाबदार आहे.
२. भारतातल्या इस्ल्मामी राजवटीचा इतिहास हा राक्तारांजीतच आहे , अगदी अकबर जो अगदी चांगला राजा असे रंगवला जातो त्याच्या राज्यात सुधा हिंदुना जीजीया कर द्यावा लागत होता.
३. बाबरी मशीद हि बाबराने राम मंदीर पडूनच बांधली होती आणि याप्रमाणे भारतात अनेक मंदिरे मुस्लिम आक्रमकांनी पाडली आहेत. http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00islamlinks/txt_eaton_temples1.pdf
४ राम मंदिर पुन्हा बांधणे हे हिंदूचे कर्तव्य आहे. आणि जर भाजप ने हा मुद्दा उचलून धरला त्यात काही चूक आहे असे मला वाटत नहि.
तुमचे दहशतवादा बद्धलचे विवेचन एकांगी वाटते. गुजरात दंगली चा उल्लेख करून तुम्ही गोधरा जाळीत कान्दाकडे सोयीस्कर पाने दुर्लक्ष केले आहे. प्रत्येक पंथाचे ठरलेले काही उद्धिष्ठ असते. इस्लाम चे उद्धिष्ठ काय आहे ते तपासून पहा. दिल्ली मधली "कुव्वत-उल-इस्लाम" मशिदीच्या दरवाज्यावर जो शिलालेख आहे तोच ती मशीद कशी बांधली गेली, बांधताना कसे काफिर मारले याचे वर्णन करतो…। या ढळढळित सत्याकडे तुम्ही दुर्लक्ष करणार का? आत्ता पर्यंत भारतात दशत्वादाचा गुन्हा सिद्ध झालेल्यांमध्ये एक तरी बिगर इस्लामी व्यक्ती आहे का?? भारतात जी शहरे संवेदनशील म्हणून समजली जातात अशा मिरज मालेगाव, भिवंडी, हैदराबाद, मुझफ्फरनगर, काश्मीर येथे मुस्लिम धर्मीय एकतर बहुसंख्यक आहेत किंवा समान लोकसंख्येत आहेत. मग दोष कुणाकडे जातो याचे विवेचन करावे.
उत्तर द्याहटवाउगाच साप साप म्हणत काठी झोडत असाल तर ते समर्थनीय नक्कीच नाही.
नाईक जी तुम्ही मांडलेला मुद्दा १०० % खरा आहे ..... देवरेंच केलेला वक्तव्य चुकीचे आहे
उत्तर द्याहटवादेवरे साहेब भारतातील अशांततेचे मूळ मागील ५०-६० वर्षातील इतिहासात शोधण्याचा प्रयत्न करत आहेत ..पण त्यांना या गोष्टीचा विसर पडतो आहे कि भारतातील अशांतता हि इ. स. १२ व्या शतका पासून जेन्वा मुस्लीमानी भारतावर आतिशय क्रूर आक्रमण सुरु
केली त्या काळापासून पासून भंगलेली आहे............
बाबरी मशीद बद्धल लिहिताना त्या बरोबर मुस्लिमांनी भारतातील उद्धवस्त केलेल्या ५०-६० हजार प्राचीन मंदिरा बाबत हि लिहित चला .......
खाली उदाहरण म्हणून फक्त एका औरंगजेबाने धूळदान केलेल्या काही मंदिरांची लिस्ट आहे jarur wacha
Destruction of Hindu Temples by Aurangzeb
http://www.hindunet.org/hindu_history/modern/temple_aurangzeb.html