शनिवार, १३ एप्रिल, २०१३

बाबासाहेब आंबेडकर- डॉ. सुधीर रा. देवरे

         भारतात आणि जगात महामानव म्हणता येतील अशी जी काही माणसं होऊन गेलीत, त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निश्चितपणे समावेश करावा लागेल. सर्वसामान्य माणसाला अनुकूल परिस्थितीत जी कामे एका आयुष्यात करता येणार नाहीत इतकी प्रचंड कामे प्रतिकूल परिस्थितीतही ज्या व्यक्ती करतात त्यांना महामानव म्हणता येईल अशी माझी महामानवाची व्याख्या आहे.
         बालपणापासून खालेल्या खस्ता, वाट्याला आलेला अपमान सहन करत नेटाने करावे लागणारे शिक्षण. यातून उभारी घेत ज्ञानलालसेने वाट शोधत एकेक पदवीचा भोजा टिपत बाबासाहेब प्रज्ञावंत होत गेले.
         बाबासाहेब हे समाजसुधारक व ज्ञानतपस्वी होते. गर्दीपासून दूर राहून संशोधकाचा-अभ्यासकाचा त्यांचा पिंड होता. त्यांना राजकारणात रस नव्हता. परंतु कायद्याविषयीच्या त्यांच्या गाढ्या अभ्यासामुळे महात्मा गांधीनी त्यांच्यातील स्फुल्लींग ओळखून, भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी त्यांना कायदामंत्री करावे अशी नेहरूंकडे शिफारस केली. आणि हे कायदामंत्रीपद मिळताच बाबासाहेबांनी या संधीचे सोने करून दाखवले.
         जगातील प्रमुख धर्मांचा सखोल अभ्यास तर त्यांनी केलाच पण भारतीय संविधान- राज्यघटना तयार करण्याच्या मिषाने जगातील काही निवडक लोकशाही देशांच्या राज्यघटना त्यांनी अभ्यासल्या. खूप ल‍वचिकही नाही आणि खूप ताठरही नाही अशी धर्मातीत निधर्मी राज्यघटना आपल्या भारताला मिळाली.
         बाबासाहेबांनी लिहिलेले समग्र ग्रंथ प्रत्येक भारतीयाने वाचावेत इतके ते अभ्यासनीय आहेत. बाबासाहेब हे स्वत:च एक विद्यापीठ होते. महापुरूष हे कोणत्याही एका जातीधर्मात बंदिस्त करता येत नाहीत. त्यांची अन्य कोणाशी उठसूठ तुलना करणेही अप्रस्तुत असते. जो तो महामानव त्या त्या ठिकाणी एकमेव असतो आणि हे महामानव सगळ्या मानव समाजाचे असतात.
         डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

७ टिप्पण्या:

 1. महामानवाशिवाय पर्याय नाही ह्या जगाला

  उत्तर द्याहटवा
 2. खुप मस्त लेख......

  समता स्वातंत्र्य आणि बंधूत्व यावर आधारीत भारतीय राज्य घटना लिहिणारे विश्वभूषण, महामानव, भारतरत्न, बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त :
  कोटी कोटी प्रणाम ! व विनम्र अभिवादन !!

  उत्तर द्याहटवा
 3. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य महान आहे. त्यांच्या गुणांविषयी योग्य शब्दात माहिती दिली. छान.

  उत्तर द्याहटवा