गुरुवार, १ एप्रिल, २०२१

भाषा: लोकसंस्कृतीचे वाहन (Culture expresses itself through Language)


 

- डॉ. सुधीर रा. देवरे

                        भाषा हे लोकसंस्कृतीचे वाहन आहे. भाषेचा जन्म लोकसंस्कृतीतून होत असतो. लोकसंस्कृतीतील वस्तूंचा जसजसा लोप होऊ लागतो तसतसा त्या संदर्भातील भाषेचाही र्‍हास होऊ लागतो व भाषा नवे रूप घेते. येथे मराठी व अहिराणी भाषांतील काही शब्दांचे उदाहरण घेऊन मुद्दा स्पष्ट केला आहे.

                 उदाहरणार्थ आड : गावागावातील आड जसे नामशेष होत आहेततसे आड संदर्भातील शब्द- संज्ञा- वाक्‍प्रचार भाषेतून लुप्त होत आहेत. रहाटआसमुठ्याबादली काढाना गळगळ टाकणेगाळ काढणेआड खोदणेआड कोरणेपुरूषभर पाणी असणेखाटेचं सुम बुडण्याइतके पाणी असणे(खाट’ ही वस्तूही नामशेष होत असल्याने सुम हा शब्दही हरवून गेला)शिकाळी आदी शब्दांना मराठी भाषा लवकरच मुकणार आहे. 

                   बैलगाडी: बैलगाडी लुप्त होत आहे. ती काही वर्षांनी कायमस्वरूपी नामशेष होईल. त्या पाठोपाठ मराठी भाषेतील कितीतरी शब्द मान टाकणार आहेत. साटलंसाटलीपांजरीसावळाजोतंजुवाडंदुशर (बैलाच्या मानेवर जुवाड ठेवण्याची जागा)आसआर्‍यादांडकेनांदनी (बैलांच्या पायाला चाक लागू नये म्हणून गाड्याला बांधलेली आडवी काठी)शिंगाड पाटली (गाडीवानाला बसण्यासाठी केलेली जागा)आखरी पेटी (आसावर बसवलेले चौकोनी लाकूड)तुंब (चाकाचा मध्यभाग) धाव बसवणे वंगननळागेजआरी नाथमाथोट्याश्याम्या काकडा शेल गाडं चकारीछकडंआंड ठेचणंबैल जुंपणंबैल दाव्याला बांधणंबैलांना पानी दाखवणं (बैल पाण्यावर नेणं)(बैलगाडीला वा औताला जोडलेले बैल हाकलण्यासाठी हटहयच्यच्य) आदी शब्द- हुंकार भाषेतून लुप्त होणार आहेत. ‘गाड्याबरोबर नळ्याची यात्रा’ ही म्हणही अर्थलुप्त होईल. 

                 बाजरी- गहू काढण्याची पद्धत: बाजरीगहू आणि इतर धान्ये काढण्याची पारंपरिक पद्धत बंद होऊन धान्ये मशीनने काढण्याची सुरूवात झाल्याने भाषेतील अनेक शब्दवाक्प्रचार नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. खळं तयार करणंखळं सारवणं वडांग करणंशिडं पडणंशिडं बुजणंवडांग शाकारणंउढी रचणंउढी फोडणंपेंढी बांधणंपेंढी फोडणंबाजरी खुडणंपाथ धरणंमुचकं बांधणंकणसं कांडणंच्याहूर फावडंपाट्या देणंडालकंसाबडंउपणणंरासव्हका घेणंउप्त घेणंचिड्या उडवणं मोगरीवार्‍याची वाट पाहणं आदी.

                 जुनी घरे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून घरांच्या संदर्भातील अनेक संज्ञा कालबाह्य झाल्या आहेत. घर शेणाने सारवणंसडा टाकणंपोतारणंभुई घेणंभुई पिटणंपिटणीचिरीसरीकड्याकिलचनआडेकडेसाने खांबकमान पांजडानं सपरंछप्परझ्यापसैडनकवाडी, शिडं, कवाडकुसनालकुमई खारी धाब्यावर खारी टाकणंधाबं निंदणंपंडाळघर गळणंधाब्यावर नळा बुजायला जाणंकौलारु घरपांजडानं घरपत्रासनं घरधबानं घरपाटाईनं घरइटासनं घरमाडीनं घर रद्दाना भितडाशिडीबोळपडवीपायथोर्‍याकोस आदी शब्द घराची रचना बदलल्याने आणि सिमेंटचा वापर होऊ लागल्याने संपुष्टात आले आहेत.

                 घरातील पाटा गेला म्हणून पाटा या शब्दासहवरवंटावाटणेठेचणे चयडणे हे शब्द गेले. कैरीचा ठेचा गेला. मिरचीचा ठेचा कालबाहय झाला. घरातील खलबत्ता गेला म्हणून खलबत्त्यासह मुसळीकांडणंकुटणंदणका देणं हे शब्द गेले.

                 घरातील घरोट गेला म्हणून घरोट शब्दासह घट्याजातंभरडकी भरडणं दळणंघरोट बसवणंघरोट उपटणंखुटादांडामाकडी हे शब्द लुप्त झाले.  हरण पळे दुध गळे’ हा उखाणा यापुढे कोणाला कळणार नाही आणि मुख्य म्हणजे जाते नामशेष झाल्याने जात्यावरील असंख्य ओव्याम्हणीउखाणेआन्हे नामशेष झालेत. घरातील उखळ गेला म्हणून उखळ या शब्दासह मुसळकांडणं हे शब्द गेले. लाकडाचा नांगरपांभरवखर, केरनऔत धरणे आजच नामशेष झाले आहेत. लोखंडाचे फणतोले कुदळपहारफाळपास ह्या वस्तू आणि पर्यायाने भाषेतील शब्दही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. विळाखुरपनंकुर्‍हाडटिकम आणि पावडी या वस्तू अजून तरी पाहण्यास मिळतात. मळ्यातील मोट इतिहासजमा झाली म्हणून मोटेवरील प्रासादिक गेय गाणी कायमची लुप्त झाली.

                 या सर्व वस्तू बनवणारे विविध कारागिर रस्त्यावर आले ते वेगळेच. घरातील भाकरींची डालकी गेली म्हणून अड्याकड्याला टांगून ठेवण्याची शिकाळी गेली. (लाकडी चौकट चार दोर्‍या बांधून छताला टांगून तिथं भाकरी ठेवत.) तोडक्या मोडक्या घरातल्या भाकरींच्या डालकीतून कुत्र्या- मांजरांनी भाकरी पळवू नयेत म्हणून शिकाळीची सोय असायची. धाब्याच्या ग्रामीण घरातील सानं गेलं. (चूल पेटवल्यावर घरातला धूर बाहेर निघून जाण्यासाठी घर बांधतानाच केलेली व्यवस्था.) घरात वा  घराबाहेर बांधलेला झोका गेला म्हणून झोक्यावरची असंख्य गाणी विस्मरणात गेली. घरात वापरण्याचा समार आहे पण तो बाजारातून आयता येतो. समार करण्याची पद्धत विस्मरणात चालली. मिरचीचा साधा लाल समार घरात केला जात नाहीआयता आणतात. लाल समाराला तिखट म्हणतात. पूर्वीचे तिखट नव्या जमान्यात मिरचीची पावडर झाली आहेती बाजारातून आयती आणली जाते. हिरव्या मिरच्या पावशीने कापल्या जात नाहीतचाकूने कट केल्या जातात. म्हणून घरातून पावशी गुप्त झाली. ग्रामीण महिलांनी नऊवारी लुगडं नेसणं सोडताच कंबळकाच, बटवा, कंबरनी पिसोडी आदी शब्द गेले. भाकरी करण्यास लाकडातून कोरलेली काठोख कोणी वापरत नाही. म्हणून काठोख या वस्तूसह भाषेतील महत्त्वपूर्ण- सौष्ठवयुक्‍त शब्द लुप्त झाला.

                 ग्रामीण भागात शेती अजूनही बर्‍याच प्रमाणात पारंपरिक पद्धतीने केली जात असल्याने शेतीची मेर म्हणजे काय हे सर्वसाधारण माणसाला समजते. भोद सारंग बांधनिंदनंखुरपनंगव्हानबंधनीवाफाबेलेबारा देणं सोला,  साकरू,  चिचना हांगोडाकैरीस्ना घडचिचोक्याकोयीसरकी, तन, बोचकं, गागा बसनं, डाभुर्लआबगाजथापतगेदूल्हाव करनंपघळनंफसकारा करणं बाशी याळ पुल्हाळ रामपहारतिसरा पहारचिपडं पडनंआखठं करनंकठान घेणंहरभरा घेवाले जाणंबाजरीवरल्या चिड्या उडावाले जाणंआरन्या आदी शब्द वा वाक्प्रचार अजून तरी तग धरून आहेत.

                 ग्रामीण भागातील रोज वापरले जाणारे काही शब्दधन मात्र लोकांच्या अंगवळणी पडलेले दिसते. उदाहरणार्थवैचा जायेललसूनचोट्टाचोखांडभरउल्हानं देनं शिळागारकडीजखडीनावरमाडमोचडंडांजनंदिवाबत्ती करणंचिपडं पडणं खुशाल, शिमर्‍या तानणंहयाती रहाणं आदी शब्दसंपदा तर वयाने चाळीस- पन्नासच्या घरात असलेली पिढी थोडीफार समजू शकते.

                 तसे शब्दधन शाबूत असल्यानेच ग्रामीणप्रधान व शेतीप्रधान रांगडी मराठी भाषा अजूनही जिवंत भासते. पुढे मागे न्यूनगंडाने या शब्दांची लाज वाटायला लागली की मराठी भाषेचा पाया धसत सांगाडा ढळू लागेल. लोकसंस्कृतीतील घटक नाहीसे होताच भाषा लयाला जाऊ लागतेअथवा उसन्या शब्दांचे नवे वळण घेत कात टाकते. भाषेतील जुने शब्द पूर्णपणे लुप्त झाल्यानेभाषेचे प्रचंड नुकसान होत असते. भाषेतील जुने शब्दधन जतन करत नव्या शब्दांचेही (इतर भाषेतीलसुद्धा) स्वागत करते ती भाषा समृद्ध होते.

                    (मराठी संशोधन पत्रिका’, जानेवारी-फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या लेखाचा संदर्भ देत हाच लेख शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१ रोजी थिंक महाराष्ट्र वर प्रकाशित झाला. लेखाचा वा लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

        © डॉ. सुधीर रा. देवरे

        ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा