- डॉ. सुधीर रा. देवरे
(पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनातर्फे दिनांक 13 एप्रिल
2014 ला माझी चार पुस्तके प्रकाशित झालीत. त्यातील ‘अहिरानी गोत’ या माझ्या पूर्णपणे अहिरानी
बोलीत असलेल्या पुस्तकातील पृ. क्र. 204 वरील चौथ्या भागातील जठे
नही येकी या शीर्षकाच्या कथासंगहातील एक संपादित कथा.)
ज्याना येक डोळा आंधळा व्हता, आशा मानोस कडथायीन
काहीतरी चुकी जयी. त्याना
शेजारना मानोस कतायना. शेजारना मानोस देवध्यानी व्हता. रोज तो देवपूजा करे.
म्हनीसन त्याले वाटे, जशा काही
देव आपला
घरना सालदारच शे. तो जरी कायम देवनी पूजा करे पन आपलागत मानोस सांगे काय चांगला वागे ना. देवना भक्त म्हनीसन आपू लोकस्शी चढेलच वागाले पाहिजे
आशा त्याना समज व्हयी कांजू. बोलालेबी तो भयानच
फाटका तोंडना व्हता.
त्याना शेजारना आंधळा मानोसकडथाइन काहीतरी चुकनं म्हनीसन
आक्खी गल्लीले आयकू जायी आशे डाच्च करीसन तो
बोलना, ‘‘म्हनतंस त्ये काही खोटं नही म्हना. तू आशा श्यास
म्हनीसनच तुले देवनी येक डोळानं आंधळं कयं. चांगला गुनना ऱ्हातासना त्ये देव तुले
आंधळं करता ना. तुनी नियत चांगली
नही, हाऊ
तुना हालकटपना पाहिसनच देवनी तुले आंधळं
कयं.’’
हायी आयकीसन आजुबाजूना पोरं मोठमोठाइन दात काढाले लागात. बायाबी तोंडले
पदर लायी हासाले लागन्यात. मोठा मानसंस्लेबी हाई आयकीसन मनातला मनात आनंद जया. गल्लीमा हाऊ इनोद आता दोन-तीन याळ सहज पुरई. येक डोळाना मानोसना चेहरा पडना. त्याले काय बोलवा आनि काय नही आशे व्हई
गयं. गाळ्या देवा का गयावया करीसन
रडवा, त्याले समजे ना. तो तश्याच गुपचूप घरमा
निंघी गया.
गल्लीमा राजूबी उभा व्हता. सगळा हसनात तऱी तो हसना
नव्हता. देवपूजा
करे त्या काकाले राजू म्हने,
‘‘काका, तुम्ही आशे नही बोलाले पाहिजे व्हतं. आज
तुमना डोळा चांगला शेतंस. हातपाय चांगला
शेतंस. पन सकाळनं कोनी पाहयं? आशे व्यंगवरथीन बोलनं चांगलं नही काका. ज्यास्ले येकच डोळा शे त्यास्नी
कोनावर रागच काढू नही का? त्यास्नी कायम
आपलापुढे भिकारीनागत लाचार ऱ्हावा, आशे तुम्हले वाटंस
का? त्यास्ना
येक डोळामुळे दोन डोळासइतकं त्यास्ले समतोल दिसत नशे. येक डोळामुळे त्या येकांगी इचार करतं व्हतीन त्ये
त्यास्ले आपू समजी घेवाले पाहिजे. वागाडी
घेवाले पाहिजे ना.’’
देवपूजा करनारा मानोसले काय बोलावा त्ये सुचेना. त्याले फगत उपदेश कराले आवडे. उपदेश आयकाले त्याना कान तयार
नव्हतात. तो घरात निंघी गया आनि कोपरामा रडत बसना.
-
डॉ. सुधीर रा. देवरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा