डॉ. सुधीर रा. देवरे
(31
डिसेंबर 1999 साली अहिराणी भाषेत लिहिलेला हा ललित लेख ‘अहिराणी वट्टा’ या माझ्या पुस्तकात- पद्मगंधा
प्रकाशन पुणे- समाविष्ट झाला आहे. कोणतेही संपादन न करता ब्लॉग म्हणून देतोय.)
दरवरीसले डिसेंबर महिना लागा का
सगळास्ले ३१ डिसेंबरना यम लागी जातंस. येकतीस डिसेंबर हाऊ याळ आपू कशा साजरा कराना हाऊ
सोबतीस्मा भयान मोठा प्रश्ननागत
चावळाना इशय व्हयी जास. मंग उघरानी किती काढनी, पार्टी कुठे करनी, चोखी करनी का तिखी करनी
हायी ठरंस. काही सोबतीस्ना घोळकामा पार्टी वल्ली करानी का कोयडी हायीबी ठरंस.
काहीस्ना मते कोयडी पार्टीमा काही दमच र्हात नही.
पार्टी पाहिजे ती वल्लीच.
आशे करता करता ३१ डिसेंबरना याळ उगी जास. जो उगनार र्हास तो उगयीच
आनि जो बुडनार र्हास तो बुडयीच, हाऊ सटीना (सृष्टीना) नियमच शे.
त्यावात फरक पडनार नही. पन पार्टी करनारास्ले वाटंस येकतीस डिसेंबर हाऊ याळ जशा
काही आपला कर्ताच उगना. दुपारपशी रेडिओ
दनदनतंस, टीव्ह्या
खनखनतीस, दुपारले
बायास्कर्ता इशेश करमनूकना कार्यक्रम टीव्ह्यास्नी आयोजित करेल राहतंस. त्यास्ना
मते त्या सगळा शो भयान कॉमेडी र्हातंस. आनि पाव्हाले जावा ते कसानं काय. पन टीव्ह्यास्ले चिटकेल लोक
कॉमेडी कार्यक्रम पाव्हाना आपला मुड, कार्यक्रम सुरू व्हवानं अगोदरपशी तयार करी
ठेवामुळे कोनी फालतू नटनी पडदावर थोडं जरी वाकडं तोंड कयं तरी दनादन हासतंस. आपू
हासनू नहीथ ते टीव्ही का हाऊ कार्यक्रम दखाडानं बंद करी टाकयी, आशे त्यासले भ्याव
वाटत व्हयी. कार्यक्रम पावशेर आनि जाहिराती किलोभर आशा सगळा मसाला रातले बारा
वाजेपावत टिव्ह्यास्वर सुरू र्हास. पन ३१
डिसेंबर साजरा कराकर्ता रोज पाही पाही पाठ व्हयेल जाहिरातीस्मा अजारमजारथीन थोडा थोडा कार्यक्रम पहात पहात लोकं- बहुत करीसन
जवान पोरं- आपला बारा वाजाडी घेतंस. आशा बारा वाजनात का मंग जुना वरीस्ले ‘बाय बाय’ आनि नवा वरीसले ‘हॅपी न्यू
इयर’ आशे
म्हनीसन फटाका फोडीसन नाची कुदी दमीसन गुमान झोपी
जातंस. काही काही लोकं गोवाले, कोकणमा, हिलस्टेशनस्वर हायी
रात साजरी करतंस.
रामपहारात उठवा त्ये रोजना माळेकच सूर्य दखास तरी बजारमा इयेल ‘हॅपी न्यू इयर’ ना ग्रीटींग कार्ड
येकमेकस्ले सोबती धाडतंस. (आता एसेमेस, फेसबुक
आणि व्हाटस् अप ना जमाना शे. आवढच वाक्य आठे add करस.) नवीन वरीसना काहीतरी
संकल्प करतंस. डायरी बियरी लिव्हाना परयोगबी कोनी
कोनी नवा वरीसना नऊ याळ पाळतंस. आनि आखो
सगळं इसरीसन रोजना याळ सारकाच जात र्हातंस. फकत रोजनी तारीख बदलंस आनि वार बदलंस. बाकी कालदिसना माळेक आज आनि आजना माळेक
सकाळ. कोनले काहीच फरक पडत नही. आपू वरीसभर काय काय
कयं ह्याना हिशोब कोनी मांडत नही. (रोज येनारा पेपरं
वरीसमजारल्या ठळक नोंदी छापी टाकतंस. टीव्ह्या, मांगल्या मोठ्या मोठ्या घटना जराश्या जराश्या दखाडीसन आढावा घेवानं काम
करतीस.) पुढला वरीसमा आपुले नक्की काय करनं शे हायी बी मनमा कोनी पक्क करत नही. फकत ‘उगेल याळले राम राम म्हनवा’ म्हनीसन इयेल याळले लोक आपापला कामले लागतंस.
‘३१ डिसेंबर’ आनि ‘१जानेवारी’ या नावस्न्या मन्या
दोन कविता मराठीमा प्रकाशित व्हयेल
शेतीस. त्या तुम्ही मराठीमा सोताच वाचा- पहिलीनं नाव
शे - ३१ डिसेंबर :
आता थोड्याच वेळात
नुतन वर्ष शतक सहस्त्रक एकविसावं वगैरे...
आता फटाके फुटतील पार्ट्या होतील
टेप खडाडतील टीव्हया भडकतील
नाचतील हसतील...
नशेतल्या मस्करीत थोबाडीत सुद्धा देतील...
समजण्यापेक्षा असमंजसपणातच
सुख शोधणारे जीव
काटा पुढे सरकताच
पुन्हा अगदी सहज झोपून जातील...!
नुतन वर्ष शतक सहस्त्रक एकविसावं वगैरे...
आता फटाके फुटतील पार्ट्या होतील
टेप खडाडतील टीव्हया भडकतील
नाचतील हसतील...
नशेतल्या मस्करीत थोबाडीत सुद्धा देतील...
समजण्यापेक्षा असमंजसपणातच
सुख शोधणारे जीव
काटा पुढे सरकताच
पुन्हा अगदी सहज झोपून जातील...!
000
दुसरी कवितानं नाव शे- १ जानेवारी:
आज एक जानेवारी दोन हजार...
आणि इथे फरक तर काहीच दिसत नाही!
अंगावरची फाटकी गोधडी बदलली गेली नाही.
सकाळ होताच रोजच्या किंचाळ्या थांबल्या नाहीत,
सूर्यसुद्धा वेळेवरच उगवला...
धुळीचे पांघरुण घेऊन ऑफिसातल्या फायली तशाच.
तीच आचकट विचकट तुसडी बाष्कळ निंदानालस्ती...
वर्ष बदलतं शतक बदलतं सहस्त्रक बदलतं म्हणजे काय!
कॅलेंडरचे नवे करकरीत पान
आणि क्षणाक्षणाने जवळ येणारा
आपल्यासह सर्वच उर्जेचा अंत
आपण आनंदाने साजरा करतो!
दुसरे काय!
आणि इथे फरक तर काहीच दिसत नाही!
अंगावरची फाटकी गोधडी बदलली गेली नाही.
सकाळ होताच रोजच्या किंचाळ्या थांबल्या नाहीत,
सूर्यसुद्धा वेळेवरच उगवला...
धुळीचे पांघरुण घेऊन ऑफिसातल्या फायली तशाच.
तीच आचकट विचकट तुसडी बाष्कळ निंदानालस्ती...
वर्ष बदलतं शतक बदलतं सहस्त्रक बदलतं म्हणजे काय!
कॅलेंडरचे नवे करकरीत पान
आणि क्षणाक्षणाने जवळ येणारा
आपल्यासह सर्वच उर्जेचा अंत
आपण आनंदाने साजरा करतो!
दुसरे काय!
(लेखातील
मजकुराचा- कवितांचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर
संदर्भ द्यावा ही विनंती.)
–
डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
लय भारी लिखेल शे...डाक्टर दादा तुमी
उत्तर द्याहटवा