- डॉ. सुधीर रा. देवरे
विरगावले आमना घरनाआडे तुळसा बोय राहे. तिले आम्ही जीजी म्हनूत. जीजीले दोन आंडरो व्हतात आनि दोन आंडरी. दोन्ही आंडरीसना लगनं व्हयी जायेल व्हतात म्हनीसन त्या त्यास्ना सासरले व्हत्यात. दोन्ही आंडरोबी बाहेर राहेत. येक सर व्हता म्हनीसन बदलीना गावले राहे ते दुसरा शेतकरी म्हनीसन दूर वावरात राहे. जीजीना घरना मानोस मालेबी आठवत नही तैन्हपशी गमी जायेल व्हता. म्हनून घरमा जीजी येकटीच राहे. याळभर याना नहीथे त्याना वट्टा दुखाडी
जीजी नुसता चावळाना गाडा भरी राहे.
आमना घरना मांगे आड व्हता. त्यावर आजूबाजूना खंडीभर घरं पानी भरेत. पेवापशीन ते वापरसापरकर्ताबी आडनंच पानी वापरनं पडे तैन. रहाटले दोर
बांधी रहाट वढीसन पानी भरनं पडे. जीजी म्हतारी बोय व्हती. तिनं वय व्हत वनं व्हतं. कोनी कोनी
तिले धैडीबी म्हने. तिले काय रहाट्य वढीसन आडनं पानी भरता इये ना. म्हनीसन जीजीले कोनीबी आडवर पानी भराले इयेल बाई येखांदी बादली पानी दि दिये. तिले हातमा रहाटे धरानी येळ इये ना. जिजी आडवर रिकामी घागर ठी जाये आनि बागेचकशी भरेल घागर उचली घी जाये.
संध्याकाळे चिपडं पडानं येळे मी आमना वट्टावर बसू तधळ जीजी तिन्हा वट्टावर दारनं मोर्हे
बशेल राहे. जीजी तठोनच माले इचारे,
हाऊ हेट्या चालना हाऊ कोन शे रे भाऊ ?
मी सांगू, गोटू काका.
जीजी म्हने, माले ते तो भागा मोहननागत दखास.
जीजीना माले आशा येळे भलता राग इये. जीजीनी नजर अधू व्हयी र्हायनी व्हती. मंग आपू कोनले इचारं ते त्यानावर भरोसा ठेवा ना. पन नही. जीजी काय इस्वास ठिये ना. म्हनीसन मी बी कतायी जाऊ. आखो जीजीनी इचारं का,
हाऊ हेट्यातीन वना हाऊ कोन शे रे भाऊ.
मंग मी बी हाटकून खोटं सांगू, राजाराम येसोद. पन तो राहे, दादा सातारकर.
बहुतेक मन्ह हायी खोटं बोलनं तधळ जीजी वळखी घीये. मंग जीजी जरासा दम खाई मोर्हे काय बोलेना. पटकशी काही सोदेना. जागेच मटरायी बशी राहे. पन जीजीनी आशी इचारानी खोड काय कायमनी मुडेना.
मळाकडथून येनारं कोनं बैलगाडं मारोतीना पारजोडे दिसनं नहीथे नुसत्या बैलस्न्या गेजास्ना आवाज वना तरी जीजी माले इचारे,
हायी कोनं गाडं वनं रे भाऊ .
मी म्हनू, काय वळखू येत नही.
तवशी जीजी म्हने, पभानं ते नही.
मी सांगू, पभा काय दखात नही पन गाडावर.
जीजी म्हने, त्याना सालदार व्हयी मंग.
मी मगज दिऊ ना. मी सांगाले कटाळा करस हायी जीजीना ध्यानमा यीसनबी जीजी काही इचारानं सोडेना.
मी संघ्याकाळे आमना वट्टावर बशीसन कधळ मधळ अहिरानी लोकगीतं म्हनू, गाना म्हनू, गीतानी प्रार्थना बी म्हनू.
ओम पार्थाय प्रतिबोधिता
भगवता नारायनेनम स्वयम
व्यासेन ग्रथिता पुरानमुनिना
मध्यमहाभारतम्...
जीजी हायी प्रार्थना कान टवकारीसन आयकी राहे. येकांददाव जीजी मंग व्हयीसन माले ती प्रार्थना म्हनाना धट लाये,
ते तू काय म्हनस ते म्हन रे भाऊ. कानस्ले ते भयान गोड लागस.
जीजीनी फरमाइश आयकीसन मालेबी बरं वाटे आनि आखो मी ती प्रार्थना म्हनू. जीजी आमनी कोनी सगीसोयरी लागेना. चुलतमुलत दूरनी नातेवाइकबी नव्हती. फगत शेजारीन व्हती. तरी आमना घर कोनी नसनं ते तिन्हा भयान आधार वाटे आमले. पन जीजी कायम आमना सोबत चांगलीच वागे आशे अजिबात नही बरका. बराचदाव ती बिनवायकारनी हिटफिट करे. मी भवरा भवरा खेळी र्हायनू आनि भवरा जर गरबडत तिन्हा वट्टावर गया ते जीजी लगेच दनकारे, वट्टा उचडयीनारे. खाल गल्लीमा खेळतनी.
जीजी कथाइन बाहेरतीन वनी आनि मी आमना वट्टावर मन्हा सोबतीससांगे
खेळतबिळत दिसनू, त्ये मंग जीजी तिनं घरनं दार उघाडाना आगोदर डोळा वटारीसन तिन्हा वट्टा आठूनतठून निरखी पाहे. कुठे तरी कैन्हना येकांदा कोपरा बिपरा उचडेल धशेल पाही टाके आनि तशे उचडेल दखाताच जीजी पटकशी डाच्च करे,
हाऊ खड्डा कोनी पाडा व्हयी काय माय आठे.
जीजी आशी शिमर्या ताना लागी का मंग मीबी कतायी जाऊ. जीजीना मनले बरं वाटाले पाहिजे म्हनीसन मी बी तो खड्डा नहीथे उचडेल वाचडेल न पाहताजोताच म्हनू, बाबाबा, येवढा मोठा खड्डा कोनी कया व्हयी भो आठे?
जीजीले मन्ह नकली वागनं बोलनं समजी जाये. आनि आपलं काय आता हसू करी घेवा म्हनीसन जीजी गडीगुप घरमा निंघी जाये. सांगयी कोनले?
आमोश्यानं संध्याकाळे घरोघरना पोर्यासोर्यास्ले कनीकना दिवा मारोतीले घी जाना पडेत. काबरं बिबरं ते काय माले ठाऊक नही भो. पन विरगावले तशी परथा व्हती. आमना घरना त्या दिवा घी जावानं काम मन्हाकडे व्हतं. तधळ जीजी माले म्हने,
दिवा घालाले जाशी तधळ मन्हाबी दिवा घी जाय बरका भाऊ.
मी जीजीना दिवा घी जाऊ. जीजीले घासतेल आननं जयं ते दारात बशी मन्ही दुकानात जावानी जीजी वाट पाही राहे. मी दुकानात चालनू आशे जीजीनी पाह्य का लगेच माले म्हने,
भाऊ मन्ह येवढं घासतेलबी घी येतनी. मी घासतेल आनी दिऊ. जीजीनं काम र्हायनं ते जीजी भाऊदादा करे.
पुढलं
शिक्षान आनि नोकरीना निमितखाल मन्ह गाव सुटी गयं. आझारमझारतीन मी घर जाऊ तधळ जीजी मन्ही इचारपुस करे. मन्ह कशे काय चालनं ते इचारे. आशाच येकदाव विरगावले गऊ तधळ जीजीनी माले घर बलायी घिदं. चावळता चावळता जीजीनी च्या करी आना. मी म्हंतं,
नको जीजी च्या कसाले कया?
जीजी म्हने, घे रे भाऊ, साखरना शे ना. घे उकाव.
माले हासू वनं. जीजी आजूनबी जुना काळमाच जगी र्हायनी व्हती. पाव्हना रावळा वनात तैन्हच त्या काळमा खेडापाडास्वर साखरना च्या व्हये. नहीते घरेदारे गुळनाच चहा व्हये. साकरना चहा पेतस त्या लोक शिरीमंत र्हातंस आशे वाटे तैन्ह आमले. गुळना चहा व्हयी, आशे माले वाटनं व्हयी आशे म्हनीसन मी पेतबीत नशे, आशे तधळ जीजीले वाटनं व्हतं.
जीजी येक दिवस जरासा आजारनं निमितखाल गमी गयी म्हने, हायी गोट माले बराच याळमा शहरमा कळनी.
माले आजूनबी मन्ह ल्हानपन जशेनतशे याद येस. आमनं जुनंपानं किलचननं घर, घरम्होरला शेनवरी सारवेल नहीथे सडा
टाकेल वट्टा, मांगलदारना चंद्र्यासनी वडांगना वाडा, तैन्हबी भयानच खोल वाटे आशा
आड, मन्हा जुना घरना शेजारनं जीजीनं जुनं घर आशे गंजनच जशेनतशे डोळासमोर येस. जीजीनीबी याद येस. गल्ली सोबतीसनी याद येस. जीजीना आंडरोबी आता दर वरीसले ध्यानात ठीसन जीजीना पित्तरं घाली देतंस. सनसुदना याळले तिन्हा नावना चुल्हामा एक घास टाकी देतंस.
जीजीनीच काय सगळास्नी जत्रा आशीच निंघी जास... आपला नंबर कैन्ह लागयी हायी आपू मनवर
घेत नहीत... आपू
धुंदीमा जगी र्हातस...
(पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘अहिराणी गोत’ या माझ्या पुस्तकातून साभार. या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या
नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
Khupcha apratim.
उत्तर द्याहटवाJayesh Sonawane, IIT Bombay.
Khupcha apratim.
उत्तर द्याहटवाJayesh Sonawane, IIT Bombay.
thanks Jayesh ji Sonawane
उत्तर द्याहटवा